News

थंडीच्या कडाक्याने मंगळवारी उत्तर महाराष्ट्र सोबतच मराठवाडा आणि विदर्भ ही कुडकुडला आहे. नाशिक जिल्ह्यातील रानवड येथे सगळ्यात कमी तापमानाची म्हणजेच 3.9 इतकी नोंद करण्यात आली.

Updated on 26 January, 2022 12:13 PM IST

थंडीच्या कडाक्याने मंगळवारी उत्तर महाराष्ट्र सोबतच मराठवाडा आणि विदर्भ ही कुडकुडला आहे. नाशिक जिल्ह्यातील रानवड येथे सगळ्यात कमी तापमानाची म्हणजेच 3.9 इतकी  नोंद करण्यात आली.

त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये पिकांवर असलेल्या दवबिंदू देखील गोठले होते. येणाऱ्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तीव्र थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी संपूर्ण राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये पारा हा 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरला होता. या थंडीच्या गहू पिकाला खूप फायदा होणार असून कांदा आणि द्राक्ष पिकांना फार मोठा धोका उद्भवू शकतो.

 येणाऱ्या 48 तास आहेत महत्त्वाचे

 पश्चिमी चक्री वाता नंतर रविवार पासून उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात किमान तापमानात घसरण झाली.येणाऱ्या 48 तासात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.किमान तापमान 10 अंश सेल्सियस च्या खाली आल्यानंतर व कमाल तापमान 28 अंशाच्या सरासरीपेक्षा चार ते सहा अंश कमी नोंदवले गेल्यानंतर थंडीची लाट असते.

राज्यात सगळ्यात नोंदवले गेलेले किमान तापमान

 रानवड 3.9, ओझर-4.0, निफाड 4.5, नाशिक 6.3, मालेगाव 8.8, जळगाव 8.6,अहमदनगर 7.9,  औरंगाबाद 8.8,बुलढाणा9.2

English Summary: all state growth in cold atmosphere 10 district in maharshtra marcury below 10 degree celsius
Published on: 26 January 2022, 12:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)