1. बातम्या

पर्यावरणातील सर्व घटक आहे महत्त्वाचा , जाणून कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग

KJ Maharashtra
KJ Maharashtra

हळू हळू सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे.कोरोना महामारीने तर जगाचे कंबरडेच मोडले आहे. सध्या ऑक्सीजन कमी पडत असल्याने अनेकांना पर्यावरणाचं महत्त्व कळत आहे. एक झाड नष्ट केल्याने आपण आपला आणि पर्यावरणातील अनेक जिवांचा जीव घिरावून घेतो. लॉकडाऊन चा तर कालावधी पुढे पुढे वाढतच चालला आहे, आपण घरी आहात प्रत्येकाने किमान २ तरी झाडे लावा, संवर्धन करा व ह्या बदलेल्या पर्यावरणाला पूर्वी सारखे दिवस आणा. चला तर खालील झाडांची माहिती करून घ्या.

१. अंजनी:-

फळ खाणारे पक्षी - १) हळदी बुलबुल, २) शिपाई बुलबुल किंवा नारद बुलबुल, ३) कुरटुक, ४) कुटुगा.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) सुरेल सातभाई, २) काळा बुलबुल, ३) रानकस्तूर, ४)रानभाई, ५) काळटोप कस्तूर.

२. आंबा :-

फळ खाणारे पक्षी - १) कीर पोपट, २) कोकीळ, ३) टोई किंवा तुईया, ४) कुटुक, ५) कुटुर्गा, ६) टकाचोर, ७) शिपाई बुलबुल, ८) लालबुड्या बुलबुल, ९) तांबट. घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी - १) हळद्या, २) शिक्रा, ३) सुभग, ४) तुरुमति ससाणा, ५) कोतवाल, ६) सातभाई, नाचण, ८) पतंगा किंवा स्वर्गीय नर्तक, ९) काळटोप कस्तूर,  १०) छोटा कुहवा, ११) गावकावळा, १२) डोमकावळा, १३) भुऱ्या गरूड.

ढोलीसाठी वापर करणारे पक्षी - १) पिंगळा, २) दयाळ, ३) जंगली मैना, ४) भांगपाडी मैना.

लपण्यासाठी डहाळ्यांचा वापर करणारे पक्षी -

१) पिंगळा.

दिवसा विश्रांती घेण्यासाठी दाट पानांचे टाळे वापरणारे पक्षी - १) साळुंकी, २) कोकीळ, ३) गावकावळा, ४) डोमकावळा, ५) हळद्या,  ६) जंगली मैना.

दिनथाऱ्यासाठी  वापर करणारे पक्षी  - १) कबरा वनघुबड किंवा धनगर.

३ . असाणा :-

फळ खाणारे पक्षी - १) लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) कोकीळ, ४) साळुंकी, ५) राखी धनेश, ६) भोरडी, ७) हळद्या, ८) बुरखा हळद्या, ९) मलबारचा राखी धनेश, १०) कुर्टूक, ११) कुटुर्गा, १२) जंगली मैना, १३) हरोळी, १४) तुरेवाला वल्गुली, १५) तांबट, १६) पवेई मैना.

४ . अंजीर :-

फळ खाणारे पक्षी -  १) राखी धनेश, २) कोकीळ, ३) कीर पोपट, ४) साळुंकी, ५) भांगपाडी मैना, ६) लालबुड्या बुलबुल, ७) शिपाई बुलबुल, ८) हळद्या, ९) तांबट, १०) फूलटोचा, ११) रेषाळ फूलटोचा, १२) जंगली मैना, १३) गावकावळा, १४) डोमकावळा.

५ . अडुळसा  :-

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर, २) जांभळा शिंजीर ३) चश्मेवाला, ४) चिमणा शिंजीर.

६.उंबर :-

फळ खाणारे पक्षी - १) तांबट, २) कुर्टक, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) कोकीळ, ६) हळद्या, ७) राखी धनेश, ८) काळटोप कस्तूर, ९) टकाचोर, १०) कुटुर्गा, ११) काळा बुलबुल, १२) हरोळी, १३) कवडा धनेश, १४) हळदी बुलबुल, १५) बुरखा हळद्या, १६) सह्याद्री हरोळी किंवा जाकीटवाली हरोळी, १७) फूलटोचा, १८) रेषाळ फूलटोचा, १९) भांगपाडी मैना, २०) साळुंकी, २१) पवेई मैना, २२) वायेरा किंवा मलबारी धनेश.

पानांवर आणि फळांवर येणारे कीटक खाणारे पक्षी- १) सुभग २) नाचण ३) नीलांग, ४) तुरेवाला वल्गुली, ५) शिंपी, ६) राखी वल्गुली, ७)राखी वटवट्या.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) गावकावळा, २) डोमकावळा.

दिनथाऱ्यासाठी  वापर करणारे पक्षी - १) हळद्या, २) बुरखा हळद्या, ३) कोतवाल, ४) साळुंकी, ५) भांगपाडी मैना, ६) रानखाटीक, ७) डोमकावळा, ८) दयाळ, १) भोरडी, १०) तांबट, ११) कुटुक, १२) कुटुर्गा, १३) भारद्वाज, १४) स्वर्गीय नर्तक, १५) कोकिळ, १६) पावशा, १७) गावकावळा. १८) श्रृंगी घुबड

७. काटेसावर :-

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर, २) जांभळा शिंजीर, ३) भोरडी, ४) हळद्या, ५) तांबट, ६) गावकावळा, ७) डोमकावळा, ८) लालबुड्या बुलबुल, ९) शिपाई बुलबुल, १०) बुरखा हळद्या, ११) शृंगराज, १२) पांढरपोट्या कोतवाल, १३) रानचिमणी, १४) सातभाई, १५) राखी वल्गुली, १६) तुरेवाला वल्गुली, १७) कवड्या सुतार, १८) सोनपाठी सुतार, १९) साळुंकी, २०) जंगली मैना, २१) कोतवाल, २२) करडा कोतवाल किंवा हिवाळी कोतवाल २३) टकाचोर, २४) भांगपाडी मैना, २५) कीर पोपट, २६) राखी धनेश, २७) कुटुर्गा, २८) रानभाई अबलख मैना किंवा कवडी मैना, ३०) लोटनचा सूर्यपक्षी, ३१) चिमणा शिंजीर, ३२) मिलिंद, ३३) रान वटवट्या, ३४) काळा बुलबुल, ३५) पहाडी पोपट किंवा शिकंदर पोपट, ३६) काळटोप कस्तूर, ३७) टोई किंवा तुईया, ३८) नीलपंखी पोपट, ३९) रेषाळ फूलटोचा, ४०) चीय किंवा पिचू पोपट, ४१) कंठेरी वटवट्या, ४२) हरेवा किंवा पत्रगुप्त, ४३) पवेई मैना, ४४) सारिका ४५) हरोळी, ४६) केशराज, ४७) छोटा भुंगराज, ४८) श्वेतकंठी सातभाई किंवा पिंगट पोटाचा सातभाई.

 

पानांवर आणि फळांवर येणारे कीटक खाणारे पक्षी-

१)वेडा राघू .

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी - १) गावकावळा, २) डोमकावळा, ३) कवड्या सुतार, ४) तांबट, ५) सोनपाठी सुतार, ६) चिमणा सुतार, ७) काळा शराटी, ८) कांडेसर, ९) शेंडीपाकोळी.

{टीप : या झाडावर सुमारे ५० पेक्षा अधिक जातीच्या पक्ष्यांची नोंद झालेली आहे. वृक्षारोपणासाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा पुष्पवृक्ष म्हणजे 'ओपन-एअर-ज्यूस - बार', पक्ष्यांसाठी जणू पक्षिनिरीक्षकांसाठी जणू काही मेजवानी असते.}

 

८.कोरांटी :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी-१) शिंपी २) राखी वटवट्या .

 

 ९ .कदंब :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावळा .

 

 १०.कळम :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी १) डोमकावळा, २) तुरेवाला सर्पगरुड, ३) बंगाली गिधाड, ४) गावकावळा

फळ खाणारे पक्षी - १) कीर पोपट, २) शिकंदर किंवा पहाडी पोपट ३) तुईया.

 

११.कडुनिंब :-

फळ खाणारे पक्षी - १) साळुंकी, २) लालबुड्या बुलबुल, ३) शिपाई बुलबुल, ४) कोकीळ, ५) फूलटोचा, ६) पपया मैना किंवा भांगपाडी मैना, ७)जंगली मैना.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१). गावकावळा २. डोमकावळा ३. तीसा ४. होला ५. शिक्रा

 

१२ .करंज :-

दिनथाऱ्यासाठी  वापर करणारे पक्षी -१) साळुंकी २) राखी वटवट्या, ३) होला, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) सातभाई, ७) रानभाई, ८) भांगपाडी मैना.

 

१३ . कपोक :-

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर २) राखी वटवट्या, ३) शिंपी, ४) लालबुड्या बुलबुल, ५) शिपाई बुलबुल, ६) भांगपाडी मैना, ७) साळुकी, ८) जांभळा शिंजीर.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) होला, २) डोमकावळा, ३) गावकावळा.

 

१४ . करवंद :-

फळ खाणारे पक्षी - १)काळटोप कस्तूर, २) लालबुड्या बुलबुल, ३) शिपाई बुलबुल, ४) माळढोक, ५) तांबट, ६) कोकीळ, ७) फूलटोचा, ८) रेषाळ फूलटोचा.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) नारद बुलबुल,  ४) रानभाई, ५) नकल्या खाटीक, ६) गांधारी, ३) सातभाई, ७) काळटोप कस्तूर.

 

 १५ . कारवी :-

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) मिलिंद, ४) सुरेल सातभाई, ५) शिंजीर, ६) काळा बुलबुल, ७) लोटनचा सूर्यपक्षी, ८) चिमणा शिंजीर

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) नारद बुलबुल, ३) सुरेल सातभाई.

बिया खाणारे पक्षी - १)  राखी रानकोंबडा, २) साकोत्री (चकोत्रा)

 

१६ . करू :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)क्षत्रबलाक.

घरट्यासाठी ढोलीचा वापरणारे पक्षी -१) कीर पोपट, २) टोई, ३) साळुंकी, ४) जंगली मैना, ५) चाप किंवा टटास.

 

१७ . कुसूंब :-

दिनथाऱ्यासाठी  वापर करणारे पक्षी -१) चश्मेवाला, २) घुलेखाऊ कोकीळा, ३) पल्लवपुच्छ कोतवाल, ४) नीलमणी, ५) नीलांग, ६) बुरखा हळद्या, ७) हळद्या, ८) स्वर्गीय नर्तक, ९) हरेवा, १०) नीलपंखी किंवा जेरडॉनचा हरेवा, ११) करडा कोतवाल, १२) पावशा, १३) कोकीळ, १४) साळुंकी, १५) कवडा होला, १६) जंगली मैना

 

१८ खैर :-   

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)गांधारी, २) होला, ३) माळकवडी, ४) पिठा होला, ५) राखी खाटीक

पानांवर आणि फळांवर येणारे कीटक खाणारे पक्षी- १) फुटकी २) शिंजीर, ३) जांभळा शिंजीर, ४) पांढरपोट्या निखार किंवा सुंदर निखार.

 

१९ . खडशेरणी :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) सागरी घार, २) घार, ३) डोमकावळा, ४) राखी धनेश, ५) शेषारी

 

२० . गोरखचिंच :- 

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) मलबारी धनेश ( माडगरूड ), ३) कवडा धनेश, ४) गावकावळा.

 

२१ गोल किंवा खरळ:- 

फळ खाणारे पक्षी - १)चश्मेवाला, २) शिपाई बुलबुल, ३) लालबुड्या बुलबुल, ४) कोकीळ, ५) कुटुक, ६) हरेवा, ७) नीलपंखी हरेवा, ८) कुटुर्गा, ९) काळा बुलबुल, १०) हळद्या, ११) बुरखा हळद्या, १२) गावकावळा, १३) डोमकावळा १४) हरोळी, १५) जंगली मैना, १६) हळदी बुलबुल, १७) साळुंकी, १८) भांगपाडी मैना, १९) कुटुक, २०) तांबट, २१) टकाचोर.

 

२२ . चेंडूफूल :-

फळ(शेंगा)खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) शिकंदर पोपट.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) शिक्रा, ३) घार, ४)गावकावला.

 

२३ . चिलार :- 

घरट्यासाठी फांद्या वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) होला, ४) सातभाई.

 

२४ . चंदन :- 

फळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) कोकीळ, ४) साळुकी, ५) जंगली मैना, ६) राखी धनेश, ७) भांगपाडी मैना.

 

२५ . चिंच :- 

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)गावकावळा, २) डोमकावळा, ३) राखी बलाक, ४) मोर बगळा, ५) छोटा बगळा, ६) पिसाळ बगळा, ७) काळा शराटी, ८) रात्रींचर बगळा, ९) घार, १०) चित्रबलाक, ११) छोटा पाणकावळा, १२) वंचक.

फांद्यांचा वापर लपण्यासाठी करणारे पक्षी -१) गावकावळा, २) डोमकावळा, ३) मोर, ४) पिंगळा, ५) घार

घरट्यासाठी ढोलीचा वापरणारे पक्षी -

१)पिंगळा.

भक्ष्यावर झडप घालण्यापूर्वी मोक्याची जागा पकडता यावी म्हणून बसायला फांद्या वापरणारे पक्षी - १)नाराच गरूड

 

२६. जाई - जुई :-           

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)शिंजीर, २) होला, ३) लालबुड्या बुलबुल, ४) काळटोप कस्तूर, ५) जांभळा शिंजीर, ६) शिपाई बुलबुल.

२७.जांभूळ :-                   

फळ खाणारे पक्षी - १)तांबट, २)राखी धनेश, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) कोकीळ, ६) हळद्या, ७) कुटुंक, ८) कुटुर्गा, ९) टकाचोर, १०) साळुंकी, ११) जंगली मैना, १२) पवेई मैना, १३) भांगपाडी मैना, १४) सह्याद्री हरोळी.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -

१) हळद्या, २) गावकावळा, ३) डोमकावळा, ४) शिक्रा.

दिनथाऱ्यासाठी  वापर करणारे पक्षी -

१) पारवा, २) साळुंकी, ३) डोमकावळा, ४) गावकावळा.

२८. जोंदुली किंवा गोविंदु :-    

फळ खाणारे पक्षी -

१) तांबट, २) कुटुर्गा, ३) हरोळी, ४) लालबुड्या बुलबुल, ५) शिपाई बुलबुल, ६) कोकीळ, ७) राखी धनेश, ८) तुईया, ९) कीर पोपट.

२९. जाम :- 

फळ आणि फुले खाणारे पक्षी - १) हरेवा, २) नीलपंखी हरेवा, ३) चिमणा शिंजीर, ४) मिलिंद, ५) टकाचोर, ६) बुरखा हळद्या, ७) सुरमा हळद्या, ८) चीय, ९) जांभळा शिंजीर, १०) शिंजीर, ११) करडा कोतवाल, १२ कीर पोपट , १३) लालबुड्या बुलबुल, १४) शिपाई बुलबुल, १५) शिंपी,  १६) सुभग, १०) राखी वटवट्या.

३०. टणटणी :-  

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी -

१)शिंजीर, २)जांभळा शिंजीर, ३) चिमणा शिंजीर, ४) मिलिंद,५) चश्मेवाला, ६)कंठेरी वटवट्या, ७)तृण वटवट्या.

फळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) नारद बुलबुल, ३) हळद्या, ४) बुरखा हळद्या, ५) फूलटोचा, ६) कोकीळ, ७) जंगली मैना, ८) हरोळी, ९) साळुंकी, १०) भांगपाडी मैना.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी

-१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) चिपका.

३१.टॅबेबुईया :- 

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -

१)रातबगळा, २) छोटा पाणकावळा, ३) वंचक, ४) डोमकावळा, ५) गावकावळा.

३२ . ड्युरांटा :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)राखी वटवट्या, २) शिपाई बुलबुल, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिंपी.

३३. डाळिंब :-        

पानं, फुलं आणि फळांवरची कीड खाणारे पक्षी -१)साळुंकी, २) लालबुड्या बुलबुल, ३) शिपाई बुलबुल, ४) भांगपाड़ी मैना, ५) जंगली मैना.

फळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २)जंगली मैना.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -

१)लालबुड्या  बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३)नकल्या खाटीक, ४) चिपका

 

३४.तोरण :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) नकल्या खाटीक.

फळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या  बुलबुल, २) नारद  बुलबुल, ३)साळुंकी, ४) भांगपाही मैना, ५)जंगली मैना, ६)तांबट, ७)कुटुक, ८) कुटुर्गा, ९)काळटोप कस्तुर.

 

३५ . तेंदू :-     

फळ खाणारे पक्षी - १)टकाचोर, २)लालबुड्या बुलबुल, ३) साळुंकी, ४) जंगली मैना, ५) हळद्या, ६) बुरखा हळद्या,    ७) कुटुर्गा, ८)हरोळी.

 ३६. तुती :-

फळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल कोकीळ, ४)साळुंकी,५) राखी धनेश, ६) जंगली मैना, ७)भांगपाडी मैना, ८)पहाडी पोपट,९) कीर पोपट, १०) चीय (लटकत्या ), ११) काळटोप  कस्तुर.

 ३७. ताडगोळा :-

घरटं करण्यासाठी पंख्यासारखी सरीदार पानं फळ खाणारे पक्षी - १) शिमरी  (ताडपाकोळी).

३८. धायटी:-  

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)जांभळा शिंजीर, २) शिंजीर, ३) चिमणा शिंजीर, ४) लालबुड्या बुलबुल, ५) शिपाई बुलबुल, ६.) राखी वटवट्या, ७) शिंपी, ८)चिपका, ९)चश्मेवाला, १०) लोटनचा शिंजीर, ११) मिलिंद,  १२) कंठेरी वटवट्या, १३)तृण वटवट्या, १४) दयाळ, १५) चीरक, १६) फूलटोचा, १७) रेषाळ फूलटोचा.

३९.नारळ :-

घरट्यासाठी झावळ्या वापरणारे पक्षी -१)सागरी घार, २)सुगरण, ३) बंगाली गिधाड, ४) दयाळ, ५)गावकावळा,  ६) डोमकावळा, ७) भारद्वाज, ८) घार.

बसण्यासाठी झावळ्यांचा वापर करणारे पक्षी- १) मलबारी धनेश, २) शेषारी,३)डोमकावळा, ४) भारद्वाज, ५) हिवाळी घार, ६) शिक्रा, ७) घार, ८) कीर पोपट, ९) शिकंदर पोपट.

 

 ४०.नेपती :-     

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) जांभळा शिंजीर, २)शिंजीर, ३) शिंपी, ४)चश्मेवाला, ५) फुटकी, ६) साळुंकी, ७) जंगली मैना, ८)भांगपाडी मैना.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २)शिपाई बुलबुल, ३) होला, ४) सातभाई, ५)माळकवडी, ६) पिठा होला.

 

४१.नांद्रूक :-   

फळ खाणारे व सावलीसाठी वापर करणारे पक्षी - १) लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) हळद्या, ४) खार बुलबुल, ५) बुरखा हळद्या,  ६) कोकीळ, ७) चश्मेवाला, ८) डोमकावळा,  ९) गावकावळा, १०) हरेवा, ११) नीलपंखी हरेवा, १२) साळुंकी, १३) जंगली मैना, १४) भांगपाडी मैना, १५) राखी धनेश, १६) हरोळी.

 

 ४२. निरगुडी:-

पानांवर येणारे कीटक खाणारे पक्षी- १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) चश्मेवाला.

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)शिंजीर, २)जांभळा शिंजीर, ३) चिमणा शिंजीर, ४)चश्मेवाला.

 

४३. पांगारा -      

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)शिंजीर, २) जांभळा शिंजीर, ३) चिमणा शिंजीर, ४) मिलिंद, ५) भोरडी, ६) जंगली मैना, ७) साळुंकी, ८) भांगपाडी मैना, ९) हळद्या, १०) कीर पोपट, ११) तांबट, १२) कुटुंक, १३) कुटुर्गा, १४) लालबुड्या बुलबुल, १५) शिपाई बुलबुल, १६) राखी वटवट्या, १७) शिंपी, १८) शृंगराज, १९) राखी वल्गुली, २०) तुरेवाला वल्गुली, २१) गावकावळा, २२) डोमकावळा, २३) पवेई मैना, २४) तुईया, २५) कोतवाल, २६) करडा कोतवाल, २०) कंठेरी वटवट्या, २८) रानभाई, २९) वटवट्या, ३०) कवड्या सुतार, ३१) पल्लवपुच्छ कोतवाल, ३२) केशराज.

फुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)रानचिमणी, २) कीर पोपट.

घरट्यासाठी ठिसूळ खोड आणि काटेरी फांद्या वापर करणारे पक्षी - १)तांबट, २) कुटुंक, ३) गावकावळा,४) डोमकावळा, ५) कवड्या सुतार, ६) काळटोप कस्तूर, ७) रानचिमणी.

 

४४ . पिंपळ :-

फळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २)शिपाई बुलबुल, ३) साळुंकी, ४) राखी धनेश, ५) तांबट, ६)पवेई मैना, ७) हरोळी, ८) हळद्या, ९) बुरखा हळद्या, १०) रेषाळ फूलटोचा, ११) कीर पोपट, १२) टोई, १३) पहाडी किंवा शिकंदर पोपट, १४) कवडा धनेश, १५) मलबारी धनेश, १६) कुटुर्गा, १७) कुर्टूग, १८) डोमकावळा, १९) गायकावळा, २०) सह्याद्री हरोळी.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावळा, ३) रातबगळा, ४) कांडेसर,५) घार, ६) व्याध गरूड, ७) काळा शराटी.

घरट्यासाठी ढोलीचा वापरणारे पक्षी -१)राखी धनेश.

लपण्यासाठी आणि विश्रांतीसाठी ढोली वापरणारे पक्षी -१)पिंगळा, २)सोनपाठी सुतार.

 

४५ . पळस :- 

मकरंद , फुलांच्या पाकळ्या , फुलांवर येणाऱ्या माश्या , मधमाश्या , फुलपाखरं आणि इतर वेगवेगळ्या जातींचे कीटक खाणारे पक्षी- १)सातभाई २) रानभाई, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) डोमकावळा, ६) गावकावळा, ७) साळुंकी, ८) राखी वल्गुली, ९) हळद्या, १०) शिंजीर, ११) जांभळा शिंजीर, १२) जंगली मैना, १३) पवेई मैना, १४) पोपई मैना, १५) भोरडी, १६) चश्मेवाला, १७) छोटा सातभाई, १८) तुईया, १९) कीर पोपट, २०) शिकंदर, २१) वेडा राघू, २२) सोनपाठी सुतार, २३) कुटुर्गा, २४) तांबट, २५) राखी धनेश, २६) शिंपी, २७) राखी वटवट्या, २८) रानचिमणी, २९, हरोळी, ३०) कोकीळ, ३१) भारद्वाज, ३२) टकाचोर, ३३) बुरखा हळद्या, ३४) कोतवाल, ३५) करडा कोतवाल, ३६) सुभग, ३७) कवडी मैना, ३८) रान वटवट्या किंवा चिरियाक, ३१) चिमणी, ४०) निळ्या शेपटीचा टिलटिला, ४१) फुटकी, ४२) पांढरपोट्या कोतवाल.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा २) गावकावळा कापशी, ४) सापमार गरूड,५)तीसा.

{टीप : खुशवाह एस ., कुमार ए. आणि कुमार डी. या अभ्यासकांनी जानेवारी २०१५ ते मार्च २०१७ या काळात बुंदेलखंडातील ( उत्तर प्रदेश ) झांसी या शहरातील ५ ठिकाणं निवडली आणि पळसावर येणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास केला. फुलांमधील मधुरस, फुलांवर येणाऱ्या मधमाश्या, फुलपाखरं आणि इतर कीटक, फुलांच्या पाकळ्या, घरटं आणि रातथारा या गोष्टींसाठी फक्त या एकाच जातीच्या वृक्षावर येणाऱ्या तब्बल ७० स्थानिक आणि स्थलांतरी पक्ष्यांची नोंद त्यांनी केली. पळस हा उत्तर प्रदेशचा राज्यवृक्ष आहे.}

 

४६. परळ :-

फुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)चिमणी.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)थोरला धोबी, २) लाजरी पाणकोंबडी, ३) तपकिरी पाणकोंबडी.

लपण्यासाठी आणि विश्रांतीसाठी वापरणारे पक्षी -१)लाल तापस, २) हिरवा बगळा, ३)वंचक किंवा भुरा बगळा.

 

४७.पेरू :- 

फळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) तांबट, ३) कुटुर्गा, ४) कोकीळ, ५) शिकंदर पोपट, ६) लालबुड्या बुलबुल, ७) शिपाई बुलबुल, ८) टकाचोर, ९) खार बुलबुल, १०) फूलटोचा, ११)रेषाळ फूलटोचा.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)नाचण किंवा नाचरा,  २) सुभग.

 

४८ . पर्जन्यवृक्ष -

विश्रांतीसाठी फांद्या वापरणारे पक्षी -१) पारवा २. डोमकावळा ३. गावकावळा ४ . साळुंकी

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)राखी वटवट्या २. शिंपी शिंजीर ३ , जांभळा शिंजीर  ४ .शिंपी

रातथारा वापर करणारे पक्षी  - १)गायबगळा,  २) छोटा बगळा, ३) रातबगळा, ४) वंचक, ५) गावकावळा, ६) साळुंकी, ७) डोमकावळा.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)शिक्रा, २)गावकावळा, ३)डोमकावाळा.

 

४९. फणसाडा :- 

फळ खाणारे पक्षी - १)मलबारचा राखी धनेश, २) कवडा धनेश, ४) काळा बुलबुल, ५) सह्याद्री हरोळी.

 

५०. फड्या निवडुंग :-

घरट्यासाठी गचपण वापरणारे पक्षी - १) होला, २) पिठा होला, ३) राखी खाटिक, ४) माळकवडी,५) गांधारी.

 

५१. बेहडा :- 

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) तुरेवाला सर्पगरूड, २) व्याध गरुड, ३) मधुबाज, ४) डोमकावळा, ५) गावकावळा.

 

५२ . बोर :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)नकल्या खाटीक, २) होला, ३) माळकवडी, ४)गांधारी, ५) लाल मुनिया किंवा रक्ती मुनिया, ६) ठिपकेवाला किंवा खवलेकरी मुनिया, ७) माळमुनिया.

फळ खाणारे पक्षी - १)हरोळी, २) लालबुड्या बुलबुल, ३) शिपाई बुलबुल, ४) साळुंकी, ५) पवेई मैना, ६) टकाचोर ७) कोकीळ , ८) माळढोक, ९) सह्याद्री हरोळी.

 

५३. बाभूळ  -

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)सुगरण २)होला, ३) नकल्या खाटीक, ४) राखी खाटीक, ५) गांधारी, ६) कापशी, ७) सापमार गरूड, ८) कोतवाल, ९) सातभाई, १०) गावकावळा, ११) डोमकावळा, १२) पांढरपोट्या निखार, १३) रानखाटीक किंवा वनकसाई, १४) माळकवडी, १५) पिठा होला किंवा जूवाला होला, १६) छोटा सातभाई.

फळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) तुईया.

सावलीसाठी वापरणारे पक्षी -१)धाविक, २) माळटिटवी,३) टिटवी, ४) माळढोक.

खोडावर येणारे कीटक खाणारे पक्षी- १)फुटकी, २)बोरू वटवट्या, ३) पर्ण वटवट्या, ४) छोटा निखार, ५) पांढरपोटया निखार, ६)चष्मेवाला,  ७) सुभग, ८) शिंपी, ९) राखी वटवट्या, १०) राखी वल्गुली, ११)शिंजीर, १२) जांभळा शिंजीर.

रातथारा वापर करणारे पक्षी  - १)भोरडी.

 

 ५४ . बांडगूळ :-    

फळ खाणारे पक्षी - १)फूलटोचा, २) रेषाळ फूलटोचा, ३) लालबुड्या बुलबुल,  ४) शिपाई बुलबुल.

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)शिंजीर, २) चिमणा शिंजीर, ३) मिलिंद, ४) जांभळा शिंजीर, ५) रानशिंजीर किंवा लोटनचा शिंजीर.

 

५५.बूच:- 

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावळा, ३) शिक्रा.४) घार.

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)दयाळ ( विणीच्या हंगामात गाणाऱ्या नराची बैठक )

 

५६.बांबू :-

घरट्यासाठी जाळी किंवा गचपन वापरणारे पक्षी -१)ठिपक्यांचा मुनिया, २) शिपाई बुलबुल,  ३) कवडा होला, ४) तामकवडा, ५)पाचू कवडा (डोंगरकवडा)

रातथारा वापर करणारे पक्षी  - १)रानभाई, २) टकाचोर, ३) निलमनी, ४) चिमणी,

बिया खाणारे पक्षी - १)राखी राजकोवडा, २) लाल रानकोवडा, ३)साकोत्रि, ४)रानभाई.

दिनथाऱ्यासाठी  वापर करणारे पक्षी -१) डूडूळा, २) घट्टेरी पिंगळा.

 

५७. बिट्टी :-

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)जांभळा  शिंजीर, २) शिंजीर, ३) चष्मेवाला,  ४) फुलटोचा,

 

५८. बकुळ :-

फळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) राखी धनेश, ४) हळद्या, ५) कोकीळ.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावळा, ३) शिंजीर,  ४)चष्मेवाला.

 

५९. मोई :-

फळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) हळद्या, ४)बुरखा हळद्या, ५) तुइया, ६)किर पोपट, ७) शिकंदर,  ८)जंगली मैना, ९)पोपई मैना, १०) टकाचोर, ११) साळुंकी, १२)पेवई मैना .

 

६० . रामबाण  ( पाणवनस्पती )  :-

घरट्यासाठी दाट जाळी वापरणारे पक्षी -१) जांभळी पाणकोंबडी, २) प्लवा बदक  किंवा हळदी - कुंकू बदक, ३)कमलपक्षी, ४) पाणकाड्या बगळा, ५) राखी बलाक, ६) नीलकमल.

रातथारा वापर करणारे पक्षी  - १)पाकोळ्या किंवा भिंगऱ्याच्या काही जाती व धोब्याच्या काही जाती

आडोसा दिनथाऱ्यासाठी  वापर करणारे पक्षी -१)जांभाळी पाणकोंबडी, २) प्लवा बदक, ३)कामलपक्षी,  ४) पाणकाडया बगळा, ५) राखी बलाक, ६) पांणडुबी, ७) वंचक, ८) चांदवा किंवा वारकरी, ९) पाणकोंबडी, १०) पिवळा तापस(लाल बगळा )१२) सारस पागोषी.

 

६१.रातराणी :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल.

फुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)चिमणी.

रातथारा वापर करणारे पक्षी  - १)चिमणी.

 

६२. कौशी :-

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)हळद्या, २) करडा कोतवाल, ३) समशेर, ४) जांभळा  शिंजीर, ५) लालबुड्या बुलबुल, ६) शिपाई बुलबुल, ७) वेडा राघू,  ८) कोतवाल, ९) सातभाई, १०) रानभाई, ११) चिमणा जिंजीर, १२)  मिलिंद, १३) रेषाळ फूलटोचा, १४) फूलटोचा, १५) पांढरपोट्या कोतवाल, १६) पल्लवपुच्छ कोतवाल, १७) बुरखा हळद्या, १८)सुरमा  हळद्या.

 

६३.  बॉटलब्रश:-

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १)फूलटोचा, २) कीर पोपट, ३) तुईया,  ४) राखी वटवट्या, ५) शिंजीर, ६) राखी वल्गुली, ७) चश्मेवाला,  ८) हरेवा ( पत्रगुप्त ), ९ ) नीलपंखी हरेवा, १०)शिंपी, ११) चीय ( लटकत्या ), १२) जांभळा शिंजीर, १३) लोटनचा शिंजीर, १४) मिलिंद, १५) चिमणा शिंजीर.

 

६४.लालकोंबड़ा :-

विश्रांतीसाठी किंवा नुसतं बसायला लहान - मोठ्या फांद्या वापरणारे पक्षी -१)वंचक, २) गावकावळा,  ३) सातभाई, ४) बंडया धीवर, ५) मधुबाज किंवा मोहोळघार, ६) पारवा, ७) हळद्या, ८) तांबट, ९) फूलटोचा, १०) रेषाळ फूलटोचा, ११) जांभळा शिजीर, १२) कारुण्य कोकिळा,  १३) खवलेकरी मुनिया, १४)डोमकावळा.

भक्ष्यावर झडप घालण्यापूर्वी मोक्याची जागा पकडता यावी म्हणून बसायला फांद्या -१) शिक्रा, २)वेडा राघू ३) कोतवाल

शेंगा खाणारे पक्षी- १) शिकंदर पोपट, २) तुईया, ३) कीर पोपट (ओल्या शेंगेतील बिया), ४) राखी वल्गुली

कळ्या किंवा फुलांमधलं पाणी -१) शिकंदर पोपट, २) हळद्या, २) कीर पोपट, ४) चश्मेवाला, ५) गावकावळा, ६) शिपाई बुलबुल, ७) लालबुड्या बुलबुल, ८) जंगली मैना, ९) साळुंकी, १०) भांगपाडी मैना, ११) पवेई मैना, १२) डोमकावळा.

फुलाच्या पाकळ्या खाणारे पक्षी- १)कीर पोपट.

फुलांच्या वाट्यांमध्ये मकरंदासाठी आलेले किडे खाणारे पक्षी- १)जंगली मैना, २) साळुंकी, ३) भांगपाडी मैना.

घरट्यासाठी ढोल्या फांदया वापरणारे पक्षी -१)कीर पोपट, २) राखी धनेश, ३) साळुंकी, ४) तांबट, ५) गावकावळा, ६) डोमकावळा, ७)हळद्या.

किडे, सरडे, सरपटे इ. खाणारे पक्षी- १)भारद्वाज, २) शिंपी, ३) पानफुटकी किंवा चिफचॅफ, ४) राखी धनेश, ५) बोरू वटवट्या, ६) सुभग, ७) नाचण, ८) राखी वल्गुली, ९) शिपाई बुलबुल, १०) लालबुड्या बुलबुल, ११) पर्ण वटवट्या,१२) दयाळ, १३) तांबुला, १४) पवेई मैना.

रातथारा वापर करणारे पक्षी  - १)राखी धनेश, २) तांबट, ३) दयाळ.

{टीप : लाल कोंबडा या झाडाचं मूळ स्थान आफ्रिका असून एक शोभिवंत झाड म्हणून आपल्या देशात आणून लावले आहे . या झाडानं भारतीय हवामानाशी आणि एकंदरच आपल्या देशातील नैसर्गिक परिस्थितीशी छान जुळवून घेतलं आहे . थोडक्यात , हे झाड आता आपल्याकडे रुळलं आहे . पुणे शहरात सौ . माधवी समीर कवी यांनी केलेल्या अभ्यासाप्रमाणे या झाडावर जातीच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे . हेच झाड जर पुण्यातील गिरीनगर येथील इंडियन आर्म।मेंट टेक्नॉलॉजी 6सारख्या नैसर्गिक अधिवासाच्या जवळ असलेल्या संस्थेच्या आवारात असेल, तर या यादीतील ३९ जातींच्या व्यतिरिक्त पक्ष्यांच्या आणखी काही नवीन जाती या झाडावर दिसण्याची शक्यता आहे. ही संस्था सिंहगडाच्या परिसरातील पानझडी जंगलाच्या अधिवासाला जवळ आहे.}

 

 ६५. वड :-

फळ खाणारे पक्षी - १)साळुंकी, २) तांबट, ३) हरोळी, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) कोकीळ, ७) लालबुड्या बुलबुल, ८) शिपाई बुलबुल, ९) हळद्या, १०) बुरखा हळद्या, ११) राखी धनेश, १२) कुटुर्गा, १३) कुरटूक, १४) हरेवा, १५) फूलटोचा, १६) तुईया, १०) पवेई मैना, १८) नीलपंखी हरेवा, १९) सह्याद्री हरोळी.

घरट्यासाठी ढोल्या फांदया वापरणारे पक्षी -१)घार, २) कापशी, ३)कांडेसर, ४) डोमकावळा, ५) गावकावळा, ६) शिक्रा, ७) तांबट, ८) मलबारी धनेश, ९) कवडा धनेश.

विश्वांतीसाठी आणि दिवसा लपून राहण्यासाठी ढोली वापरणारे पक्षी -१)पिंगळा.

 

६६. विलायती चिंच :-

फळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) लालबुड्या बुलबुल, ३)नारद बुलबुल, ४) साळुंकी, ५) जंगली मैना, ६) राखी धनेश, ७) शिकंदर पोपट, ८) चिमणी, ९) कोकीळ, १०) हळद्या, ११) बुरखा हळद्या, १२) भांगपाडी मैना, १३) फूलटोचा, १४) रेपाळ फूलटोचा

खोडावर येणारे कीटक खाणारे पक्षी- १)सुभग, २) शिंपी, ३) राखी वटवट्या, ४) बोरु वटवट्या,

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)गावकावळा, २) डोमकावळा.

 

६७. वावळा :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)डोमकावळा, २) गावकावका, ३) घार, ४) शिक्रा.

फळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट.

 

६८. शिंदी :-

घरट्यासाठी पानं आणि पानांचे बेचके वापरणारे पक्षी -१)सुगरण, २) गावकावळा, ३) डोमकावळा, ४) भारद्वाज, ५) जंगली मैना.

फळ खाणारे पक्षी - १)डोमकावळा, २) गावकावळा, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) साळुंकी, ६) जंगली मैना, ७) टकाचोर, ८) भांगपाडी मैना, ९) कोकीळ, १०) राखी धनेश.

{टीप : या झाडाच्या पानाचे तंतू काढून सुगरण आपलं घरटं विणते.}

 

६९. शेवगा :-

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) शिंजीर, २) शिंपी, ३) जांभळा शिंजीर, ४) राखी वटवट्या, ५) रेषाळ फूलटोचा, ६) फूलटोचा.

खोडावर येणारे कीटक अळ्या खाणारे पक्षी- १)सुभग, २) चश्मेवाला, ३) राखी वल्गुली, ४) तुरेवाला वल्गुली, ५) पानफुटकी, ६) बोरू वटवट्या, ७) शिंपी, ८) राखी वटवट्या, ९) कवड्या सुतार, १०) चिमणा सुतार, ११) लालबुड्या बुलबुल, १२) दयाळ.

शेंगा खाणारे पक्षी - १)कीर पोपट

 

७०. शंकासूर :-

फळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) शिकंदर पोपट.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) शिंजीर.

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) फूलटोचा, २) शिंजीर, ३) जांभळा शिंजीर.

 

७१. सिंगापुरी चेरी :-

फळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) कोकीळ, ४) फुलटोचा, ५) हरोळी, ६) तांबट, ७) गावकायला, ८) राखी धनेश, ९) रेषाळ फूलटोचा, १०) चीय.

फुलांमधील मकरंद शोषणारे पक्षी - १) जांभळा शिंजीर, २) शिंजीर.

 

 ७२. साग :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)रानखाटीक २. शेंडीपाकोळी किंवा तुरेवाली झाडपाकोळी ३. रानकस्तूर ४. काळटोप कस्तूर 

{टीप : या झाडाच्या फुलोऱ्याचे देठ होला हा पक्षी आपल्या घरत्यासाठी वापरतो.}

 

७३ . सोनचाफा :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)गावकावळा २. डोमकावळा३.हरेवा ४. नीलपंखी किंवा जेरडॉनचा हरेवा ५. शिपाई बुलबुल ६. लालबुड्या बुलबुल ७. सुभग

फळ खाणारे पक्षी - १) कोकीळ २. साळुंकी ३. लालबुड्या बुलबुल ४. शिपाई बुलबुल ५. डोमकावळा ६ . गायकावळा ७. जंगली मैना ८. भांगपाडी मैना

 

 ७४ . सीताफळ :-

फळ खाणारे पक्षी - १)कीर पोपट, २) तांबट तुईया, ३) लालबुड्या बुलबुल, ४) शिपाई बुलबुल, ५) खार बुलबुल, ६) साळुंकी, ७) भांगपाडी मैना, ८) पवेई मैना, ९) जंगली मैना, १०) टोई, ११) कुटुर्गा, १२) कुरटूक, १३) राखी धनेश, १४) फूलटोचा, १५) रेषाळ फूलटोचा.

{टीप : काही ठिकाणी या झाडाची ८० टक्के फळं राखी धनेश खाऊन संपवतात.}

 

 ७५. सालई :-

फळ खाणारे पक्षी - १)तुईया २. कीर पोपट.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)छोटा निखार किंवा सहेली ( हिंदी नाव), २) शेंडीपाकोळी, ३) कुहुवा, ४) सातभाई, ५) रानखाटीक.

घरट्यासाठी ढोल्या वापरणारे पक्षी -१)ढोल्यांमधून डिंक बाहेर येत नसेल तर डूडूळासारख्या छोट्या घुबडांच्या ( Owlets ) काही जाती घरटी करतात .

{टीप : छोटा निखार हा पक्षी सालईची कागदासारखी पातळ साल वापरून आपल्या घरट्याची वाटी तयार करतो.}

 

७६. हिवर :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)नकल्या खाटीक, २) गांधारी, ३) जांभळा शिजीर, ४) होला, ५) माळकवडी, ६) पिठा होला (जूवाला होला), ७) राखी खाटीक, ८) माळमुनिया, ९) रक्ती मुनिया किंवा लाल मुनिया

 

७७.हिरडा :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)तुरेवाला सर्पगरुड, २) डोम, ३)व्याध गरुड.

घरट्यासाठी ढोलीचा वापरणारे पक्षी -१)तुईया, २) डुडुला, ३) शिकंदर पोपट.

 

७८.ऐन :-

पानांवरील आणि फांद्यांवरील कीटक खाणारे पक्षी - १)बुरखा हळद्या, २) हळद्या, ३) छोटा कुहुवा, ४) मोठा कुहुवा, ५) टकाचोर, ६) पांढरपोट्या कोतवाल, ७) छोटा निखार, ८) साळुंकी, ९) राखी वल्गुली, १०) भांगपाडी मैना, ११) स्वर्गीय नर्तक, १२) घुलेखाऊ कोकीळा, १३) करडा कोतवाल, १४) सोनपाठी सुतार, १५) कवड्या सुतार, १६) नीलपंखी हरेवा, १७) पर्ण वटवट्या.

घरट्यासाठी आणि दिवसा विश्वांती घेण्यासाठी ढोल्या वापरणारे पक्षी -१)पवेई मैना, २) राखी धनेश, ३) शिकंदर पोपट, ४) कीर पोपट, ५) तुईया, ६) साळुंकी, ७) दयाळ, ८) पट्टेरी पिंगळा, 9) डुडुळा.

फांद्या पोखरून बिळांसारखी घरटी वापरणारे पक्षी -१) कवड्या सुतार, २) सोनपाठी सुतार, ३) कुटुर्गा.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)शिक्रा, २) डोमकावळा, ३) व्याध गरूड, ४) पल्लवपुच्छ कोतवाल, ५) बुरखा हळद्या, ६) तुरेवाला सर्पगरूड, ७) मधुबाज, ८) शैडीपाकोली.

 

७९.  मोह :-

फुलं खाणारे पक्षी - १)साळुकी, २) तांबट, ३) हरोमी, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) कोकिळा, ७) लालबुड्या बुलबुल, ८) शिपाई बुलबुल, ९) हळद्या, १०) राखी धनेश, ११) चुरखा हल्या, १२) कुटुर्गा, १३) भांगपाडी मैना, १४) पवेई मैना, १५) तुईषा, १६) शिकंदर पोपट, १७) कीर पोपट, १८) फुलटोचा, १९) रेपाळ फुलटोचा, २०) हरेवा, २१) नीलपंखी हरेवा, २२) टकाचोर, २३) कवडी मैना

दिवसा विश्रांती घेण्यासाठी दाट पर्णसंभार , फांद्या आणि ढोल्या वापरणारे पक्षी -१)शृंगी घुबड, २) गिरनारी घुबड, ३) गावकावळा.

 

८०.चार किंवा चारोळी :-

फळ खाणारे पक्षी - १)साळुकी, २) तांबट, ३)हरोळी, ४) गावकावळा, ५) डोमकावळा, ६) कोकिळा, ७) लालबुड्या बुलबुल, ८) शिपाई बुलबुल, ९) हळद्या, १०) राखी धनेश, ११) बुरखा हळद्या, १२) कुटुर्गा, १३) भांगपाडी मैना, १४) पवेई मैना, १५) तुईया, १६) शिकंदर पोपट, १७) कीर पोपट, १८) फुलटोचा, १९) रेषाळ फुलटोचा, २०) हरेवा, २१) नीलपंखी हरेवा, २२) टकाचोर, २३) कवडी मैना, २४) हरोळी.

 

८१ . रामफळ :-

फळ खाणारे पक्षी - १)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) डोमकावळा, ४) गावकावळा, ५) ताबट, ६) हळद्या, ७) सुरमा हळद्या, ८) बुरखा हळद्या, ९) साळुकी, १०) जंगली मैना, ११) भांगपाडी मैना, १२) टकाचोर, १३) कुटुर्गा, १४) खार बुलबुल, १५) कीर पोपट, १६) कोकिळ, १७) फूलटोचा, १८) रेषाळ फूलटोचा.

 

८२ . मधुमालती :-

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल, ३) शिंजीर, ४) जांभळा शिंजीर, ५) मिलिंद, ६) ठिपक्यांचा मुनिया.

८३.प्राजक्त :-

रातथारा वापरणारे पक्षी -१)चिमणी, २) शिंपी.

घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१)लालबुड्या बुलबुल, २) शिपाई बुलबुल.

लेखक - राजेश डवरे , कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र वाशिम

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters