पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात येतात
.ही योजना आत्तापर्यंत सरकारच्या योजना मधील सगळ्यात यशस्वी योजना आहे. आतापर्यंत जवळजवळ या योजनेचे दहा हप्ते शेतकऱ्यांना दिले गेले असून आता अकरावा हप्ता लवकरच एप्रिल ते जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्रशासनातर्फे शेतकरी सहभाग प्राधान्य आमचे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आता जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना शेतकरी सहभाग प्राधान्य आमचे या उपक्रमांतर्गत किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे एक मेपर्यंत विशेष ग्रामसभा आयोजित करून ज्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत किसान क्रेडिट कार्ड मिळाली नाही अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरून ते संबंधित बँक शाखांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यासाठी सरकारने सूचना जारी केली असून त्यानुसार, ज्या पी एम किसान निधी चा लाभार्थ्यांकडून किसान क्रेडिट कार्ड नाही अशा लाभार्थ्यांनी बँकेशी संपर्क साधून त्यासंबंधीचा अर्ज करायचा आहे किंवा करू शकता. त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह एक घोषणा पत्र देखील द्यावे लागणार आहे.
अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात अर्ज
यामध्ये एक साधा एक पानाचा अर्ज व त्याच्यासोबत तुमच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे, तुम्ही तुमच्या जमिनीत लावलेले पिकाचा तपशील आणि संबंधित लाभार्थ्याला बँकेकडून कोणत्याही प्रकारचे किसान क्रेडिट कार्ड सुविधा मिळत नसल्याचे जाहीर करावे लागणार आहे. या योजनेअंतर्गत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना च्या प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांनाकिसान क्रेडिट कार्ड चा फायदा मिळावा हा उद्देश सरकारचा आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने ई केवायसी करून घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये महत्वाची माहिती अशी की सरकारकडून तुम्ही लॅपटॉप अथवा तुमच्या मोबाईलवरून ई केवायसी करण्याची सुविधा पुन्हा सुरू केली आहे.
त्याची शेवटची मुदत 31 मे असून तोपर्यंत ई केवायसी पूर्ण करायचे आहे. नाहीतर तुमचा अकरावा हप्ता येणार नाही. याची काळजी प्रत्येक लाभार्थ्यांने घ्यायची आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:धेनू अँपच्या आधुनिक तंत्रामुळे शेतकऱ्यांना लाखों रुपयांचा फायदा
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो उष्णतेपासून जनावरांना वाचवायचे असेल तर ही होमिओपॅथिक औषधे वापरा, दूधही वाढेल
Published on: 29 April 2022, 08:03 IST