News

विदर्भातील चंद्रपूरला जोरदार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली. तर कोल्हापुरात देखील पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगेने धोक्याची पातळी ओलाडंली आहे.

Updated on 01 September, 2023 5:45 PM IST

Weather News 

देशाच्या अनेक भागात मान्सून सक्रिय झाला असून जोरदार पाऊस सुरु आहे. आज (दि.२४) रोजी राज्यात कोकणासह, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. 

कोल्हापुरात देखील पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगेने धोक्याची पातळी ओलाडंली आहे. तर पंचगंगेची इशारा पातळी ३९ फुटांवर आहे. तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे.

कोकण, घाटमाथ्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची मुसळधार सुरूच आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. विदर्भासह मराठवाड्यात विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट), उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

English Summary: Alert anywhere in the state Know the rain news
Published on: 24 July 2023, 10:29 IST