News

संपूर्ण जगाला एक प्रकारे बंदिस्त करण्याची किमया ज्या कोरोना विषाणूने केली त्याच जीवघेण्या

Updated on 29 August, 2022 8:49 PM IST

संपूर्ण जगाला एक प्रकारे बंदिस्त करण्याची किमया ज्या कोरोना विषाणूने केली त्याच जीवघेण्या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लस शोधून काढण्यामध्ये सुद्धा आपला देश अग्रणीच राहिला. कोवॅक्सीन,कोविशिल्ड आणि लहानग्यांसाठी कार्बोवॅक्स अश्या लसी उपलब्ध होत संपूर्ण देशभर लसीकरण मोहीम राबवीत कोरोना प्रतिबंध करण्यात आपण यशस्वी झालो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे

मार्गदर्शनात अनेकानेक समाजपयोगी उपक्रम राबवत आपली बांधिलकी जोपासली होती हे विशेष.It is special that he cultivated his commitment while carrying out social activities.याच शृंखलेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून अधिष्ठाता कृषि डॉ. श्यामसुंदर माने यांचे मार्गदर्शनात दोन दिवसीय "कोविड बूस्टर डोस शिबिर" नुकतेच आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक संघ, अकोला

महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ "दवाखाना "येथे संपन्न झालेल्या या लसीकरण शिबिराचे उद्घाटक म्हणून मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र वणी रंभापूरचे मुख्य बिजोत्पादन अधिकारी डॉ ताराचंद राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. तर याप्रसंगी डॉ एच एन सेठी संचालक मध्यवर्ती संशोधन केंद्र, डॉ सतीश ठाकरे उप कुलसचिव,परीक्षा विभाग डॉ संजय भोयर विभाग प्रमुख मृद विज्ञान व

कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ नितीन गुप्ता विभाग प्रमुख फुल शास्त्र व प्रांगण विद्या,डॉ प्रमोद वाकळे, विभाग प्रमुख विस्तार शिक्षण ,श्री समीर अहमद उपकुलसचिव आस्थापना,डॉ किशोर कुबडे प्राध्यापक कृषी महाविद्यालय नागपूर ,डॉ संजय कोकाटे सहाय्यक प्राध्यापक व डॉ अनुप चौधरी कोविड लसीकरण अधिकारी आस्थापना प्रमुख

पाहुणे म्हणून उपस्थित होते शिबिराच्या सुरुवातीलाच मुख्य पाहुण्यांनी बूस्टर डोस घेऊन सुरुवात केली ह्या शिबिरामध्ये जवळपास 444 लाभार्थींनी को वॅक्सिंन,कोविशील्ड व बारा ते अठरा वयोगटातील मुलांनी कार्बो वॅक्स डोस घेतला. याव्यतिरिक्त विद्यापीठातील विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मजूर यांनी सुद्धा शिबिराचा लाभ घेतला.

सदर शिबिर यशस्वी करण्याकरता विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ संदीप हाडोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ गोपाल दाभाडकर, महानगरपालिकाअकोला येथील आरोग्य कर्मचारी डॉ लहाने मॅडम व त्यांची चमू व विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील कर्मचारी श्री बोबडे, श्री इरतकर डॉ तांबे, डॉ देशमुख , सौ आडे ,सौ खोसे, कमलेश कदम, राजू कनोजिया व श्री.कोगदे यांनी परिश्रम घेतले.

English Summary: Akola Agricultural University Kovid booster dose camp completed! An initiative of the Department of Student Welfare
Published on: 29 August 2022, 08:49 IST