तर शेतीक्षेत्राला वीज पुरवठा करताना आठ तासच केला जातो. यामध्येसुद्धा तो कधी दिवसा तर कधी रात्रीच्या कालावधीत केला जातो.
एवढेच नाही तर त्यामध्ये देखील अनियमितता आहे. या पार्श्वभूमीवर कृषी पंप व इतर शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने शेतकर्यांना 24 तास वीजपुरवठा करावा, या आशयाची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राज्य संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे. याविषयी बोलताना गजानन पांडे म्हणाले की, शेती क्षेत्र सोडून कुठल्याही उद्योगांचा विचार केला तर चोवीस तास वीजपुरवठा करण्यात येतो.
नक्की वाचा:खरं काय! शेतकऱ्याने जमीन राखायला ठेवले अस्वल; अस्वलास सॅलरी सुद्धा……
परंतु कृषी क्षेत्राला आठवड्यातून तीन दिवस दिवसा तीन ते चार तास आणि रात्री चार ते पाच तास वीज पुरवठा केला जातो. शासनाच्या या भेदभावपूर्ण धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून रात्रंदिवस शेतकरी काबाडकष्ट करतात अशा शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. त्याच वेळी इतर उद्योगासमोर लाल गालिचा अंथरला जातो. जर इतर उद्योगधंद्यांचा विचार केला तर लाखोंची वीज बिल थकबाकी असताना त्यांच्यावर मेहरबानी केली जाते मात्र गरीब शेतकऱ्याकडे हजारो थकबाकी असताना त्यांचेवीज कनेक्शन खंडित केले जाते.
या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करावे लागत आहे असे असतानाही वीज विभाग गांभीर्याने घेत नाही.
त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. अनेक शासकीय योजनांचा विचार केला तर शेतकऱ्यांना 80 ते 90 टक्के अनुदान देण्यात आली मात्र प्रत्यक्षात 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. याकडे देखील ग्राहक पंचायतीने लक्ष वेधून जाहीर केलेल्या अनुदानाची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.
प्रतिकूल हवामान, अवकाळी पाऊस तसेच गारपीटअशा नैसर्गिक संकटांमुळे पिकांच्या नुकसानीची भरपाई महाराष्ट्र सरकारकडून केली जाते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे जाहीर केलेली रक्कम थेट शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे. इत्यादी मागण्या त्यांनी केल्या.
Published on: 01 April 2022, 07:32 IST