अतिरिक्त उसाचे गाळप पूर्ण केल्याशिवाय कारखाने बंद करणार नसल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. असे असताना आता अजित पवारांनी याबाबत एक बैठकघेतली. अजित पवार यांनी ज्या कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे त्यांचे हार्वेस्टर ज्यांचे गाळप अजून राहिले आहे, त्याठिकाणी पाठवण्याचे आदेश दिले होते. यामुळे आता यंत्रणा हालू लागली आहे. अजूनही अनेकांचा ऊस फडातच आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
आता हार्वेस्टर ऊस शिल्लक असलेल्या जिल्ह्याकडे मार्गस्थ केले जात आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने शिल्लक उसाचा आढावा घेतला असून राज्यात 90 लाख ऊस गाळपाचा राहिलेला आहे. यामुळे मे अखेरपर्यंत कारखाने चालुच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता दीड महिन्यामध्ये गाळप पूर्ण करण्याचे उद्दीष्ट हे साखर कारखान्यांसमोर राहणार आहे. यामुळे आता यंत्रणा कामाला लागली आहे.
पाऊस सुरु होण्याच्या आधी सगळ्या उसाचे गाळप पूर्ण करावे लागणार आहे. यामुळे आता आपला ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. तसे नियोजन सध्या केले जात आहे. सध्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निकाली लावणे हेच ध्येय असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच याचे नियोजन करण्यासाठी समन्वय अधिकारी नेमले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे गाळप पूर्ण झाल्यामुळे या भागातील हार्वेस्टर आता मराठवाड्यातील कारखान्यांना भाडेतत्वावर देण्यात येत आहेत. सध्या उन्हाचा जोर वाढल्याने ऊसतोड मजूर जास्तीचे पैसे शेतकऱ्यांकडे मागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक येथील हार्वेस्टर सध्या बीड, जालना, लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये पाठवले जात आहेत. यामुळे आपला ऊस तोडून जाईल, अशी अशा शेतकऱ्यांना आहे.
महत्वाच्या बातम्या;
चालत्या-फिरत्या पेट्रोल पंपामुळे शेतकऱ्यांना फायदा, घरपोच मिळतय पेट्रोल..
आता कोंबडी पालन करण्यासाठी सरकार देतंय ५० टक्के अनुदान, 'असा' घ्या लाभ
शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या 'त्या' शेळीची माहिती..
Published on: 10 April 2022, 05:23 IST