News

पुणे - पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधताना पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांबद्ल माहिती दिली.

Updated on 11 March, 2020 1:57 PM IST


पुणे - पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधताना पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांबद्ल माहिती दिली. कोरोना व्हायरसविषयी अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काही दिवसांपासून चिकन-मटन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होते, अशा प्रकारच्या अफवांना पेव फुटले आहे.यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले.

दरम्यान पुण्यात कोरोना बाधित पाच संशयित रुग्ण आढळल्याने राज्यात दहशत पसरली आहे. खबरदारीचा पर्याय म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली. यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयीचा आढावा घेऊन माहिती दिली. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन दोन्ही मंत्र्यांनी केले आहे. चिकन-मटण खाल्याने कोरोना व्हायरस होत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

कोरोना संदर्भात सरकारकडून एक संदेश देण्यात आला. तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवावा असेही ते म्हणालेत. दरम्यान अफवा पसरल्यामुळे राज्यातील चिकनचे दर घसरले आहेत. तर काही ठिकाणी पोल्ट्री मालक कोंबड्यांची अंडी नष्ट करत आहेत. चिकनचे दर कोसळल्यामुळे चिकन विक्रेत्यांवर आर्थिक संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील चिकन मार्केट असोसिएशन अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

English Summary: ajit pawar says, chicken is not cause of corona virus
Published on: 11 March 2020, 01:00 IST