News

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर ते सुरुवातीला 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये आले होते. मात्र आज पहिल्याच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते पक्षाचा कार्यक्रम म्हणून नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Updated on 07 October, 2023 10:55 AM IST

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (दि.७) रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार कृषी क्षेत्राची पाहणी करणार आहेत. तसंच विविध कार्यक्रमाचे उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये पार पडणार आहे. मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्ष नेत्यांचे दौरे वाढले आहेत.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर ते सुरुवातीला 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये आले होते. मात्र आज पहिल्याच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते पक्षाचा कार्यक्रम म्हणून नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अजित पवार आज दिंडोरी, कळवण, नाशिक भागाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनात सायंकाळी सहाला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ असणार आहेत.

कळवण येथील साई लॉन्स येथे पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी व कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या पुढाकारातून हा मेळावा होत आहे. तसंच नाशिकमधील प्रसिद्ध सह्याद्री फार्मला देखील अजित पवार भेट देणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षाचे दौरे होत असतात. तसंच राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार यांनी सभा घेऊन मंत्री छगन भुजबळांसह इतर बंडखोर नेत्यांनाही इशारा दिला होता. त्यामुळे आजच्या दौऱ्याकडे राजकीय दुष्ट्या आणि आगामी निवडणूक लक्षात घेता महत्त्व प्राप्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी केला होता नाशिक दौरा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दुष्टीने नेत्यांचे दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत.

English Summary: Ajit Pawar Nashik Visit update
Published on: 07 October 2023, 10:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)