News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Updated on 03 August, 2022 6:27 PM IST

यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीविषयीचे विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. दरम्यान, या भेटीत बांठिया आयोगाच्या अहवालातील ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात, त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने ९२ नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याबाबत जो निर्णय दिला आहे, त्याबाबत देखील मागणी केली आहे.

दरम्यान, त्याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणीही पत्राद्वारे माजी मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी केली. यावेळी आ. नितीन पवार, आ. अनिल पाटील, आ. सुनिल भुसारा आदी नेते उपस्थित होते. यामुळे आता शेतकऱ्यांना कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता शेतकऱ्यांना पंप संच घेण्यासाठी मिळणार २० हजार रुपये, असा घ्या लाभ..

दरम्यान, गडचिरोली, वर्धा याठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अजित पवार यांनी या भागाचा दौरा केला आहे. यावेळी अजित पवार यांनी सरकारकडे मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या;
केंद्राकडून मोठी सूचना! मंकीपॉक्सचा धोका वाढल्याने घेतला निर्णय..
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकार ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याच्या तयारीत
तुम्ही नेमके आहात कोण? कोर्टाचा शिंदे गटाला थेट सवाल, निर्णय विरोधात जाण्याची शक्यता

English Summary: Ajit Pawar met Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Published on: 03 August 2022, 06:27 IST