News

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. ते नेमकं कशामुळे भाजपकडे गेले याबाबत चर्चा सुरू आहे. त्यांचे अनेक घोटाळ्यात नाव आल्याने त्यांनी असे केले का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

Updated on 06 July, 2023 1:24 PM IST

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. ते नेमकं कशामुळे भाजपकडे गेले याबाबत चर्चा सुरू आहे. त्यांचे अनेक घोटाळ्यात नाव आल्याने त्यांनी असे केले का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

असे असताना महाराष्ट्र राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले होते. याबाबत चौकशी देखील सुरू आहे.

आता या आरोपपत्राची विषेश 'पीएमएलए' प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट कोर्टाकडून दखल घेतली आहे. यावेळी जरंडेश्वर एस.एस.के. कारखान्याच्या गहाण मालमत्तेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर सहकारी बँकांनी २२६ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. मात्र त्यातून काम झाले नाही.

पाण्याअभावी पिके जळाली! पंचनामे करण्यासाठी शेतकरी संघटनेचे निवेदन

यामध्ये आर्थिक फायद्याासठी कारखान्याची मालमत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारण्यांनी कवडीमोल दराने संपादीत केल्याचे निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवले आहे. यामुळे आता अजित पवार अडचणीत आले आहेत.

सध्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे आता तरी ते चौकशीतून मुक्त होतील, असे म्हटले जात होते. दरम्यान, आरोपपत्राची आता विषेश 'पीएमएलए' कोर्टाकडून दखल घेतली आहे.

काळ्या टोमॅटोच्या शेतीतून मिळवा लाखोंचे उत्पन्न! जाणून घ्या लागवड, खर्च आणि उत्पन्न…

या प्रकरणी संबंधित लोकांना 'समन्स' बजावण्यात आलेले आहेत. तसेच आरोपपत्रानुसार या घोटाळ्याच्या माध्यमातून अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी मोठा आर्थिक फायदा करून घेतला.

त्यांना कवडीमोल दराने त्यांना कारखाना मिळाला. त्यांनी या कारखान्याच्या नावावर पुणे जिल्हा बँकेकडून ८२६ कोटी रुपायंचे कर्ज घेतले. काही पैसे परदेशात देखील पाठवल्याचे यात म्हटले आहे. यामुळे ते अडचणीत आले आहेत.

हार्वेस्टर मशीनवर ५०% सबसिडी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
भारतातील सर्वात महागडी म्हैस, किंमत 9 कोटी आणि वजन 1500 किलो
बांबूचे लाकूड का जाळत नाहीत? जाणून घ्या काय आहे सत्य..

English Summary: Ajit Pawar in trouble again in case of state bank scam, big news about Jarandeshwar factory came out..
Published on: 06 July 2023, 01:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)