News

सध्या बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या चार जागा आपल्याकडे आहे. परंतु इतर काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे. तसंच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असणाऱ्या काही जागा देखील लढवल्या जाणार आहेत, असंही अजित पवार म्हणाले.

Updated on 01 December, 2023 2:06 PM IST

Raigad News : महाराष्ट्रात आता सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. महायुतीत असणाऱ्या अजित पवार गटाने चार जागा लढणार असल्याचे जाहीर केले आहे. बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१) रोजी जाहीर केले आहे. कर्जतमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात अजित पवार बोलत होते. अधिवेशनाचा हा शेवटचा आणि दुसरा दिवस आहे.

सध्या बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या चार जागा आपल्याकडे आहे. परंतु इतर काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे. तसंच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असणाऱ्या काही जागा देखील लढवल्या जाणार आहेत, असंही अजित पवार म्हणाले. तसंच ठाकरे गटाच्या जागांबाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे.

पुढे अजित पवार म्हणाले की, मार्च महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला ४८ खासदार निवडून आणायचे आहेत.

दरम्यान, माझ्यावर जे आरोप झाले ते निर्णय मी एकट्याने घेतले नव्हते. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी होती. तसंच त्यावेळी नेमलेल्या समितीचा अहवाल आला आणि त्यांनी मला क्लीन चीट दिली. तसंच मी कमीटमेंट पाळणारा नेता आहे. माझ्यावर आजपर्यंत कुठल्याही डीपीसीसंदर्भात आरोप नाही. काम व्हावी हीच कार्यकर्त्यांची अपेक्षा असते.

English Summary: Ajit Pawar group will contest Baramati Shirur Satara Raigad Lok Sabha elections Ajit Pawar made it clear
Published on: 01 December 2023, 02:06 IST