आज विधानसभेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसच्या प्रश्नावरून सुधीर मुंगटीवार आणि अजित पवार आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादकांच्या बोनसचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर अजित पवारांनी स्पष्ट सांगितले की धान उत्पादकांना आम्ही बोनस देणार नाहीत.
कारण बोनसची मदत शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीकारण काही दलाल त्यामध्ये पैसे घेतात.त्याऐवजी अजित पवार यांनीधान उत्पादकांसाठी मोठा निर्णयजाहीर करताना 600 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.
नक्की वाचा:शिष्टमंडळाची शरद पवारांना भेट: कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी शरद पवारांना घातले साकडे
यावेळी अजित पवार म्हणाले की एकर मागे आम्ही काही मदत देऊ परंतु बोनस न देता सहाशे कोटी रुपयांचे पॅकेज देऊ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या नावाने मिळणारी रक्कमही शेतकऱ्याच्या हातात जावी यासाठी बोनस ऐवजी शेतकऱ्याला प्रतिएकर मदत देता येईल का? याचा राज्य सरकार विचार करीत असल्याचे सांगतानाचत्यांनी ही घोषणा केली. बोनस विषयाची मागणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी शासनाने धान खरेदी सुरू केली आहेत्याद्वारे शेतकऱ्यांना आधारभूत किंमत देखील मिळत आहे
मात्र या वर्षीचा बोनस मिळालेला नाही तो बोनस द्यावा अशी मागणी वैभव नाईक यांनी सभागृहात केली.तसेच भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 2013 पासून सुरू केलेली बोनस देण्याची पद्धत सुरू ठेवावी अशी मागणी केली.
या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटले की, धान उत्पादकांना बोनस न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बोनस ऐवजी शेतकऱ्यांना जितके क्षेत्रावर त्यांनी धानाचे उत्पादन केले आहे त्यानुसार काही मदत करता येते का? याची चाचपणी सुरू केली असल्याचे स्पष्ट केले सोबत शेजारील मध्यप्रदेश व छत्तीसगड सारख्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे हेदेखीलबघितले जाईल.
कारण बोनस जाहीर केल्यानंतर शेजारच्या राज्यातील देखील माल आपल्याकडे येतो आणि तेदेखील बोनस मागतात.तसेच राज्यांमध्ये बोनस वाटप करताना शेतकऱ्यांना न मिळता मध्ये व्यापारी त्यात घोटाळा करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.त्यामुळे बोनस न देता प्रतिएकर मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.
Published on: 21 March 2022, 07:08 IST