News

राज्यातील कृषक व अकृषक पदवीधर आणि ग्रामीण भागातील युवक युवतींकरता त्यांचे सामाजिक, शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या पदवीधर संघटनेच्या (ग्रॅज्युएट्स असोसिएशन) विद्यार्थी आघाडीच्या प्रादेशाध्यक्षाची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

Updated on 18 October, 2021 8:49 PM IST

पदवीधर संघटनेने स्थापने पासून कृषी व संलग्न पदवीधर आणि विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. कृषी पदवीतील विद्यार्थ्यांना कोरोना काळात फी माफी मिळावी त्याच बरोबर कृषी पदविकेच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीला प्रवेश नाकारण्यात आला असताना या विद्यार्थ्यांना कृषी पदवीस प्रवेश मिळावा या करता संघटनेने यशश्वी पाठपुरावा केला असून सदर मागण्यांना यश मिळाले आहे.

राज्यातील कृषक व अकृषक पदवीधर आणि ग्रामीण भागातील युवक युवतींकरता त्यांचे सामाजिक, शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या पदवीधर संघटनेच्या (ग्रॅज्युएट्स असोसिएशन) विद्यार्थी आघाडीच्या प्रादेशाध्यक्षाची नुकतीच निवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे पदवीधर संघटना कृषी पदवीधरांसोबतच राज्यातील अकृषी पदवीधरांमध्ये विशेष लोकप्रिय संघटना म्हणून ओळखल्या जाते.विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती महाविद्यालयीन आणि विद्यापीठ पातळीवरील इतर तांत्रिक अडचणीसंबंधित समस्या सोडवण्याकरता पदवीधर संघटनेची विद्यार्थी आघाडी आणि पदाधिकारी कार्यरत आहेत. 

विद्यार्थ्यांचे प्रश्न स्थानीक पातळीवरच तात्काळ सुटावे आणि संघटना विस्ताराच्या दृष्टिकोनातून पदवीधर संघटना विद्यार्थी आघाडीच्या पहिल्या प्रादेशाध्यक्षाची निवड नुकतीच संघटनेच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली असून अजित सुनीलराव देशमुख यांची विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष प्रणव टोम्पे यांनी केली. या बैठकीस संघटना अध्यक्ष प्रणव टोम्पे, उपाध्यक्ष ऐश्वर्या मेस्त्री, मुंबई विभाग प्रमुख यज्ञेश कदम, शामराव जाधव, सर्व विभागाचे संपर्कप्रमुख उपस्थित होते. देशमुख यांच्या नियुक्तीने विदर्भातील कृषी पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये मध्ये उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळते आहे अशी माहिती विद्यार्थी

आघाडी संपर्क प्रमुख राजेश्वर राऊत यांनी दिली. अंकुश होटे, मुकेश पोरे, प्रतीक कारंजकर , सागर बारब्दे, सुरज भगत, निखिल चौधरी, ऋचा भोयर, उत्कर्ष धिकार, श्याम काळे आदींनी देशमुख यांच्या निवडीचे स्वागत केले.

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Ajit Deshmukh elected as State President of Graduate Students Union
Published on: 18 October 2021, 08:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)