बारामती तालुक्यातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांसाठी १०३ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे आता अनेक कामांना गती मिळणार आहे. यामध्ये १२ गावे ५८ वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. बारामती तालुक्यात मोठा भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या प्रश्न निर्माण होतो. यासाठी आता 'जलजीवन मिशन' अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांसाठी १०३ कोटी रकमेच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता ही कामे लवकरात लवकर सुरु होणार आहेत. याचा फायदा अनेक नागरिकांना होणार आहे.
या योजनेसाठी पाटबंधारे विभागाचा साठवण तलाव, जलशुद्धीकरण केंद्र व उंच जलकुंभ यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आता नीरा डाव्या कालव्यातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणासाठी पाटबंधारे खात्याने रीतसर परवाना दिला आहे. यामुळे याचे काम आता लवकरच सुरु होणार आहे. तालुक्यात या अगोदर ३३९ कोटी रुपयांच्या ६० गावांच्या ७ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली.
उर्वरित १९० कोटी रुपयांच्या प्रादेशिक योजना प्रस्तावित पाणी पुरवठा खात्याकडे जमा केला. योजना समितीचे समन्वयक संभाजी होळकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. या योजनांसाठी साठवण तलाव, मुख्य संतुलन पाणी टाकी, जलशुद्धीकरण केंद्र, उंच जलकुंभ, पंपहाउस या बाबीबरोबर या योजनेसाठी सौरऊर्जाद्वारे वीज उपलब्ध होईल. यामुळे याचा मोठा फायदा होणार आहे. याचा फायदा म्हणजे योजना वीज देयकावरील ग्रामपंचायतींचा खर्च कमी येईल.
दरम्यान, बारामतीमध्ये अनेक कामे सध्या मोठ्या गतीने सुरु आहेत, यामध्ये एसटी बस्थानक, कालव्याचे काम, पंचायत समितीचे काम, रोडची कामे यासह अनेक कामे सुरु आहेत. यामुळे येणाऱ्या काळात अनेक विकासाची कामे दिसणार आहेत. यामुळे बारामतीच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनामुळे हजारो लोकांना फायदा होणार आहे.
Published on: 04 February 2022, 05:13 IST