राज्य सरकार ने सत्ता स्थापन केल्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी मित्रांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये देण्याची घोषणा सरकार ने सत्ता स्थापन करण्यावेळी केली होती. सत्तेत आल्यावर त्यांनी कर्जमाफी केली होती परंतु तू आमलात अजिबात आणली नाही. यामागे सुद्धा अनेक वेगवेगळी कारणे आहेत त्यामागे कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनली होती आणि राज्याच्या तिजोरीत खडखडाट सुद्धा झाला होता. त्यामुळे हे रक्कम शेतकरी वर्गाला देणे कठीण आणि अवघड असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले आहे.
खरीप हंगामाच्या तयारीला लागा:
यंदाच्या वर्षी अवकाळी पावसामुळे तसेच अनेक कारणांमुळे खरीप हंगामातील उत्पन्न मोठया प्रमाणात घटले आहे. तसेच यंदाच्या वर्षी हवामान खात्याने शुभ सूचना केल्या आहेत. यंदाच्या साली राज्यात मान्सून चे आगमन वेळेत होईल शिवाय हंगामात सुद्धा उत्पादनात वाढ होईल असा इशारा शेतकरी बांधवांना केला आहे. त्यामुळे यंदा च्या वर्षी शेतकरी वर्गावर पेरणीचे दुबार संकट हे अजिबात ओढवणार नाही असा अंदाज सुद्धा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा च्या साली शेतीची सर्व कामे आटपून खरीप हंगामाच्या तयारीला लागा असे वकृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
हेही वाचा:आशियातील गहू आयातदार भारताने गहू निर्यातीवर बंदी घालताच आले मोठ्या संकटात
प्रोत्साहनपर योजनेचा पुन्हा विचार करणार:-
सरकार स्थापन करताना कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली होती परंतु कोरोना सारख्या महामारी मुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला होता. जो शेतकरी कर्जाची सर्व रक्कम भरेल त्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर देण्यात येणार होते परंतु सध्या च्या घडीला हे श्यक्य नसल्याने प्रोत्साहनपर योजनेचा पुन्हा एकदा विचार करण्यात येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीज.
तब्बल 10 वर्ष्यानंतर कृषी प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे काम:-
प्रादेशिक कृषी उत्पन्न म्हणून कृषी प्रशिक्षण साठी इमारतीचे काम सुरू केले होते गेल्या 10 वर्ष्यापासून हे काम रखडले होते. परंतु अजित पवारांनी अधिकाऱ्यांची चांगलीच सुनावणी केल्यानंतर अखेर कामाला सुरुवात झाली आहे.
Published on: 17 May 2022, 07:13 IST