News

अॅग्रीकल्चर जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच AJAIचा भव्य लॉन्च सोहळा आज नवी दिल्ली येथे पार पडला. हा कार्यक्रम युसूफ सराय येथील AJAI मुख्यालयात आणि झूम मीटिंगद्वारे आयोजित करण्यात आला होता. AJAI ही MC Dominic द्वारे आयोजित केलेली राष्ट्रीय-स्तरीय संस्था आहे.

Updated on 21 July, 2022 7:26 PM IST

अॅग्रीकल्चर जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच AJAIचा भव्य लॉन्च सोहळा आज नवी दिल्ली येथे पार पडला. हा कार्यक्रम युसूफ सराय येथील AJAI मुख्यालयात आणि झूम मीटिंगद्वारे आयोजित करण्यात आला होता. AJAI ही MC Dominic द्वारे आयोजित केलेली राष्ट्रीय-स्तरीय संस्था आहे. AJAI या संस्थेचा शहरापासून ते खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा उद्देश आहे.

AJAI च्या अधिकृत लोगोचे अनावरण केंद्रीय कॅबिनेट मंत्री मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, परशोथम गोदाभाई रुपाला यांच्या हस्ते झाले. तर AJAI च्या अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण आंतरराष्ट्रीय कृषी पत्रकार महासंघाच्या अध्यक्षा लीना जोहानसन यांच्या हस्ते करण्यात आले. 'अजय म्हणजे ज्याचा कधीच पराजय होत नाही' अशा शब्दात केंद्रीय कॅबिनेट मंत्री परशोत्तम रूपाला यांनी AJAIबद्दल गौरवोद्गार काढले.

तसेच आपलं culture हे agriculture आहे. आणि अजयच्या प्लॅटफॉर्मद्वारे सरकार आणि शेतकऱ्यांच्यात समन्वय साधणं सोपं होईल. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पुढे ते असंही म्हणाले, आपल्याला दोन दिवसांचं जेवण मिळण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रगती होणं गरजेचं आहे. AJAI द्वारे प्रत्येक गावात प्रतिनिधी नेमला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सद्यपरिस्थिती लोकांपर्यंत पोहचायला मदत मिळेल.

एम सी डॉमिनिक यांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे. आणि त्यांनी ठरवलेल्या अपेक्षेपेक्षाही अधिक सफलता त्यांना मिळू दे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आजचा कार्यक्रम हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. तसेच पत्रकारितेच्या इतिहासातील हा एक अनोखा प्रयत्न आहे. यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

शेती आणि पत्रकारिता या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत आहेत ही खरोखरच अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी कौतुक केले. शेतकऱ्यांच्या बाजूने काम करण्याची एकही संधी आपण सोडू नये. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच नवनवीन शोधांनाही सामोरे जावे. या कार्यक्रमात कृषी पत्रकार, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, शेती व्यवसायाशी निगडित अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात "सध्याच्या परिस्थितीत कृषी-पत्रकारितेचे महत्त्व" याविषयावर चर्चा देखील करण्यात आली.

इव्हेंटमध्ये सामील होणारे तज्ञ स्टडेड पॅनेल आहेत, चर्चेत डॉ. ए के सिंग, डीडीजी विस्तार, आयसीएआर, अॅडलबर्टो रॉसी, महासचिव (आयएफएजे), डॉ. एसके मल्होत्रा, प्रकल्प संचालक - डीकेएमए (आयसीएआर), डॉ. जेपी मिश्रा ओएसडी (पॉलिसी प्लॅनिंग आणि पार्टनरशिप) आणि एडीजी (आयआर), आयसीएआर श्री. एड्रियन बेल, कोषाध्यक्ष, आयएफएजे, डॉ. बी.आर. कंबोज, कुलगुरू, सीसीएस हरियाणा कृषी विद्यापीठ,

हिस्सार, डॉ. कृष्ण कुमार, व्हीसी, आरपीसीएयू, पुसा, समस्तीपूर, बिहार, डॉ. व्ही. प्रवीण राव, कुलगुरू, पीजे तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ, हैदराबाद, डॉ. ए.के. कर्नाटक, कुलगुरू, उत्तराखंड कृषी विद्यापीठ, डॉ. आरएस कुरीएल, कुलगुरू, एमजीयूएचएफ, छत्तीसगड प्रा. प्रभा शंकर शुक्ला, कुलगुरू, नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी, शिलाँग, ह्यू मेनार्ड, ग्लोबल मॅनेजर, IFAJ चौधरी मोहम्मद इक्बाल, कृषी संचालक, श्री नगर काश्मीर,

अवधेश कुंवर, उत्तर प्रदेशचे कृषी संचालक एडीए प्रशार, उत्तर प्रदेशचे माजी कृषी संचालक सोरज सिंग, डॉ. एस भट्टाचार्जी, माजी व्यवस्थापकीय संचालक, NERAMAC Ltd. सरकार भारताचे इस्माईल उगुरल, अध्यक्ष, TGAI, कंवल सिंग चौहान, पद्मश्री पुरस्कार विजेते, प्रगतीशील शेतकरी, आनंद त्रिपाठी, माजी जेडीए ब्यूरो,

कृषी विभाग, उत्तर प्रदेश, डॉ. व्ही.व्ही.सदामाते, कृषी नियोजनाचे माजी सल्लागार डॉ. कल्याण गोस्वामी, डीजी, एसीएफआय कमिशन, संजीब मुखर्जी, ट्रेड स्टँडर्ड्स आदी दिग्गज मान्यवरांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी AJAI च्या पुढील कार्यासाठी सदिच्छा दिल्या.

AJAI बद्दल: AJAI ची सुरुवात MC डॉमिनिक यांनी केली होती, जे संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत. AJAI हे कृषी पत्रकारितेच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक-टॉप व्यासपीठ आहे. असोसिएशनद्वारे आपल्या सदस्यांसाठी चर्चासत्रे, चर्चा, कार्यशाळा आणि कार्यक्रम आयोजित करून आणि उद्योगातील प्रमुख व्यक्तींशी संवाद साधण्याच्या संधी निर्माण करून उद्योगाला एकत्र जोडण्याचे काम करत आहे.

English Summary: 'AJAI' Historic Moment in Agriculture Journalism: Union Minister Parashottama Rupala!
Published on: 21 July 2022, 06:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)