News

सध्या शिवसेना भाजपमध्ये जोरदार टीका टिप्पणी सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शहा यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. यामुळे आता शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे यांना जमिनीवर आणलं पाहिजे अशी टीका अमित शहा यांनी केली.

Updated on 06 September, 2022 12:36 PM IST

सध्या शिवसेना भाजपमध्ये जोरदार टीका टिप्पणी सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शहा यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. यामुळे आता शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे यांना जमिनीवर आणलं पाहिजे अशी टीका अमित शहा यांनी केली.

यामुळे आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून जहरी टीका केली आहे. अहमदशाह, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शाह अशा शब्दात त्यांनी अमित शहांवर टीका केली आहे. यामुळे आता याची चर्चा सुरु आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करतांना म्हटले आहे की, अहमदशाह, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शाह.

दिल्लीवरून किती शहा आले माझ्या राज्याचे राज्य जिकण्यासाठी, पण गद्दारांची साथ घेऊन पण मराठी मावळा चवताळून उठला तसाच आजही तेच करायची वेळ आली. जनता शिवसेनेसोबतच! जय महाराष्ट्र! अशी पोस्ट त्यांनी केली आहे. अमित शहा यांचेसारखे देशपातळीवरील भाजपचे नेते मुंबईत येतात हे शिवसेनेचं नैतिक यश असल्याचं दानवे म्हणाले.

दरम्यान, आता मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. यामुळे आता भाजप काय उत्तर देणार हे लवकरच समजेल. उद्धव ठकरे हे जमिनीवरच आहे. मुळात भाजपच आकाशात असून, त्यांना जमिनीवर आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचं दानवे म्हणाले. यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जोरदार टक्कर बघायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या;

English Summary: 'Ahmad Shah, Adil Shah, Nizam Shah, Qutub Shah now Amit Shah'
Published on: 06 September 2022, 12:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)