अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान आणि बरेच पिकांचे बाजारपेठेत घसरलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले गेले आहे.या पार्श्वभूमीवर आता दिवाळीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकशेतकर्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज शून्य टक्के व्याजदरानेदेणार आहे.यासंबंधीचा निर्णयबँकेच्या संचालक मंडळाने जाहीर केल्याचे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके व उपाध्यक्ष ऍड.माधवराव कानवडे यांनी सांगितले.
शासनाच्या असलेल्या व्याजदराच्या परतावा धोरणानुसार तीन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज शुन्य टक्के दराने उपलब्ध होत आहेव त्यापुढील कर्ज मात्र शेतकर्यांना प्रचलित व्याजदराने घ्यावे लागत होते. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने नेहमीच चांगले निर्णय घेणारी बँकेने त्या अनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेतयावर चर्चा झाली. या बैठकीत ही मर्यादा 3 लाखावरून वाढवून पाच लाखांपर्यंत करण्यात आली. दिलेल्या कर्जाचे व्याज बँकेच्या स्वभांडवलातून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यात सेवा संस्थांच्या माध्यमातून सुमारे तीन लाख शेतकरी कर्जदार सभासदांनादोन लाख 24 हजार हेक्टर क्षेत्रासाठी1726 कोटींचे कर्जवाटप एकटा जिल्हा बँकेने केले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील 50 ते 65 टक्के शेतकऱ्यांना या बँकेने कर्ज दिले आहे.यामधील वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे त्यासाठीशेतकऱ्यांनी वेळेतसर्वांनी वेळेत कर्ज परतफेड करावी असे आवाहन शेळके यांनी केले.
Published on: 28 October 2021, 12:50 IST