News

चालू वर्षासाठी खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत तब्बल 1951 कोटी 17 लाख 82 हजार रुपयांचे पीककर्ज शून्य टक्के व्याज दराने वाटप करण्यात आले आहे.

Updated on 13 February, 2022 10:12 AM IST

चालू वर्षासाठी खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत तब्बल 1951 कोटी 17 लाख 82 हजार रुपयांचे पीककर्ज शून्य टक्के व्याज दराने वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जवळ जवळ तीन लाख 32 हजार शेतकरी सभासदांना सेवा संस्थांच्या माध्यमातून या योजनेचा लाभ झाला अशी माहिती अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांनी दिली. शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळावे व त्यांना शेतीच्या कामामध्ये अर्थसाहाय्य उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. जर शेतकऱ्यांनी या कर्जाची फेड मुदतीत केली तर शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराचा फायदा मिळणार आहे.

यामध्ये तीन लाखांपर्यंत असलेल्या कर्जाची रक्कम जर शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत परतफेड केली तर केंद्र सरकार व राज्य सरकारचे प्रत्येकी तीन टक्के प्रमाणे सवलतीची  रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहे एवढेच नाही तर बँक तीन लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतचे पिक कर्जाचे व्याज स्वनिधीतून भरणा करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना 2021 ते 22 पासून पाच लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.. 

यासाठी शेतकरी सभासदांनी त्यांच्याकडील अल्पमुदत पीक कर्जाची दिलेल्या मुदतीत व्याजासह परतफेड करावी असे आवाहन बँकेचे अध्यक्ष एडवोकेट शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे व संचालक मंडळाने केली आहे.

English Summary: ahemednager district central bank give 1951 crore crop loan in zero percent intrest rate
Published on: 13 February 2022, 10:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)