News

बोटाद, गुजरात: ‘एग्रोस्टार’ कंपनीच्यावतीने मागील वर्षी दुसऱ्या कापूस बंपर धमाका स्पर्धेत भाग्यवान ठरलेल्या कापूस शेतकऱ्यांसाठी बोटाद येथील महानगरपालिका हॉलमध्ये बक्षिस समारंभ आयोजित करण्यात आला. या स्पर्धेत कंपनीकडून मागील वर्षी बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता.

Updated on 10 April, 2019 7:37 AM IST


बोटाद, गुजरात:
‘एग्रोस्टार’ कंपनीच्यावतीने मागील वर्षी दुसऱ्या कापूस बंपर धमाका स्पर्धेत भाग्यवान ठरलेल्या कापूस शेतकऱ्यांसाठी बोटाद येथील महानगरपालिका हॉलमध्ये बक्षिस समारंभ आयोजित करण्यात आला. या स्पर्धेत कंपनीकडून मागील वर्षी बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता.

व्यवस्थितरीत्या व पारदर्शी लकी ड्राॅ च्या माध्यमातून जवळजवळ हजार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मागील वर्षाप्रमाणेच, यंदा ही भाग्यवान शेतकऱ्यांनी मोबाईल, बाइक व बॅटरी पंप यांसारखे अनेक बक्षिसे जिंकली. त्याचबरोबर सर्वात भाग्यवान शेतकरी राजकोट जिल्हयातील तालुका गोंडल येथील गोमता या गावातील रमेशभाई डढानिया यांना ट्रॅक्टर देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलर एग्रोटेक प्राइवेट लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. टी.एल.डी. धोलारिया, डॉ. टी.एम.भरपोडा, एग्रोस्टारचे निदेशक हसमुख दवे आदि उपस्थित होते.

हसमुख दवे म्हणाले, “एग्रोस्टारचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीबाबत मार्गदर्शन करणे, नवनव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून योग्य माहिती देणे व कमी खर्चात जास्त उत्पादन देणे हा आहे. त्याचबरोबर मातीची स्थिती, पाणी उपलब्धता व शेती पध्दतीत बदल पाहता, शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीपासून ते प्रगतशील शेतीस प्रोत्साहन देणे हा देखील आहे.” एग्रोस्टार ही एक प्रमुख कंपनी आहे. जी नवनव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वास्तविक वेळेत कृषी संबंधित माहिती देण्यासाठी शेती, शेतकरी व विशिष्ट डेटाचा उपयोग करते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देण्यासाठी मदत करते.

यंदा कापूस हंगामासाठी एग्रोस्टारने ‘गोल्ड सर्व्हिस’ ही सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून एग्रोस्टारचे ‘एग्री डॉक्टर’ व्यक्तिगतरीत्या सर्व कापूस शेतकऱ्यांना कापूस लागवडीपासून ते काढणीपर्यंत वैज्ञानिक मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर त्यांना शेतीतील माती व सिंचनासाठी उपयुक्त असणाऱ्या योग्य कापसाच्या वाण निवडीसाठी मोफत मार्गदर्शन देतील. जेणेकरून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल व कापसामधील कीटक व रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाचारासाठीदेखील मार्गदर्शन तसेच अन्नद्रव्याचे व्यवस्थापनाच्या साहाय्याने लागवडीपासून ते काढणीपर्यंतदेखील मोफत सल्ला देतील. ज्या शेतकऱ्यांना ‘गोल्ड सर्व्हिस’ विषयी माहिती जाणून घ्यायची असेल, तर त्यांनी 1800 3000 7345 या नंबरवर मिस कॉल द्यावा.

एग्रोस्टार विषयी:

एग्रोस्टारचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना जागतिक स्तराचे कृषी मार्गदर्शन, बाजारपेठा व क्रेडिट विषयी सर्व माहिती एका विस्तृत साखळीच्या रूपात वाढीव मुल्य शेतकऱ्यांना देण्याचे कार्य करते. सध्या ही कंपनी गुजरात, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांमध्ये 5 लाख शेतकऱ्यांसोबत डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहे. या तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीमधील पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी अँड्रॉईड एपच्या माध्यमातून देशातील सर्वोच्च रेटेड कृषी केंद्रित एपचा उपयोग करू शकता किंवा मिस कॉलच्या माध्यमातूनदेखील माहिती मिळवू शकता. 

English Summary: AgroStar objective is to make the farmers self sufficient
Published on: 10 April 2019, 07:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)