News

शेतकऱ्यांना आपापल्या भागातील हवामान, जमीन आणि पाणी या विषयी तंतोतंत आणि अचूक माहिती मिळावी म्हणून हवामान विभागाच्यावतीने संपूर्ण देशात 200 कृषी हवामान स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.

Updated on 12 April, 2021 2:00 PM IST

 शेतकऱ्यांना आपापल्या भागातील हवामान, जमीन आणि पाणी या विषयी तंतोतंत आणि अचूक माहिती मिळावी म्हणून हवामान विभागाच्यावतीने संपूर्ण देशात 200 कृषी हवामान स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.

या दोनशे कृषी प्रजन्य मापन केंद्रामध्ये महाराष्ट्रातील जवळ जवळ दहा केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. लेक केंद्रांच्या उभारण्याचे काम चालू असून येत्या पावसाळ्याच्या आत ती कार्यान्वित करण्यात येतील.

 

उपकरण  विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना जमिनीतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग त्यामुळे होणारे जमिनीचे बाष्पीभवन हे पिकाच्या वाढीसाठी आणि पिकाला पाणी देण्यासाठी महत्त्वाचे असते. या कृषी केंद्राच्या सहाय्याने शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील जमिनीतील आर्द्रता, कमाल व किमान तापमान, वाऱ्याचा वेग आणि दिशा याबद्दलची माहिती दिली जाईल.

त्याचबरोबर जमिनीत किती खोलवर ओलावा आहे,  तसेच संबंधित जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे याची माहितीकरून दिली जाणार आहे.यामध्ये महाराष्ट्रातील दहा केंद्राचा समावेश आहे.  पालघर,  सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, वाशिम,  नागपूर, गडचिरोली,  बुलढाणा, भंडारा,  नंदुरबारया जिल्ह्यांमध्ये कृषी स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र सुरू होणार आहे.

देशभरातील जवळपास दोनशे कृषी हवामान स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र उभारण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून येत्या पावसाळ्यापूर्वी ही केंद्र सुरू होतील.

English Summary: Agro-climatic rain gauge centers to be set up in ten districts
Published on: 30 March 2021, 05:32 IST