पुणे : कोरोनासारख्य महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. मार्च महिन्यापासून संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली. उद्योग आणि सेवा क्षेत्र जवळजवळ ठप्प झाले आहे. देश मोठ्या आर्थिक संकटाच्या दिशेने जात आहे. या सगळ्या अंधकारमय वातावरणात शेती हे एकमात्र क्षेत्र आहे जे भारताला वाचवू शकते, असे भारतातील प्रसिद्ध रेटिंग संस्था क्रिसिलने नुकतेच म्हटले आहे. याला कारणही तसेच आहे. यावर्षी मॉन्सूनने वेळेवर हाजरी लावली आहे.
बिहार आणि मध्यप्रदेशमध्ये सरासरीपेक्षा ८०% अधिक पाऊस झाला आहे. महाराष्ट्र, पंजाब, गुजरातमध्ये आतापर्यंत सरसरीइतका पाऊस झाला आहे. १५ जुलैपर्यंत देशातील पर्जन्यमान दीर्घ सरासरीच्या ११% च्या जास्त आहे. जूनमध्ये देखील पर्जन्यमान २४% अधिक होते. क्रिसिलच्या मतानुसार, यावर्षी खरिपाची लागवड मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त झाली आहे. मागच्या वर्षी जूनमध्ये पाऊस दीर्घ सरासरीच्या ३०% कमी पडला होता. आणि एकूण खरिपाच्या फक्त १४% पेरण्या जूनमध्ये झाल्या होत्या. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे. या वर्षीचा काळ २०१५ चहा खरिपासारखा असून त्यावर्षीदेखील जूनमध्ये दीर्घ सरासरीपेक्षा २९% अधिक पाऊस झाला होता. क्रिसिल ही देशातील अत्यंत नावाजलेली आणि विश्वासपूर्ण रेटिंग संस्था आहे. उद्योग आणि व्यवसाय याची पत म्हणजे बाजारतील किंमत ही संस्था अभ्यास करून ठरवते. क्रिसीलसारख्या संस्थांचा अभ्यास किंवा निरीक्षणे परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करताना दाखल घेतात.
त्यामुळे आतापर्यंत परिस्थिती सामान्य आहे. मागच्या काही दिवसात शेतीमुळे देशाच्या अर्थव्यूवस्थेला चालना मिळत असल्याचे आपण पहिले आहे. जून महिन्यात ग्रामीण भागात मागणी वाढल्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत ट्रॅक्टरची मागणी वाढली असल्याचे आपण पहिले आहे. या ताळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. शहरी अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जर पुढचे दोन महिने व्यवस्थित पाऊस राहिला तर सर्वच गोष्टींना ग्रामीण भागातून अधिक मागणी तयार होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची रुतलेली चाके पुन्हा मोकळी होतील.
Published on: 25 July 2020, 03:37 IST