१.राज्यात किमान तापमानात चढ उतार,थंदीची लाट कायम
२.रस्ते विकास कामांच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्याच्या विकासावर भर : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
३.सेंद्रिय शेतीचा प्रश्न सुटेपर्यंत केंद्राकडे पाठपुरावा करणार-शरद पवार
४.आता ई-पीकपाहणीची पद्धत बदलणार
५.नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा, कांदा मार्केट सुरू होणार
१.राज्यात किमान तापमानात चढ उतार,थंदीची लाट कायम
राज्यात गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात वाढ झाली आहे अस असले तरी राज्यात गारठा कायम राहणार आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला होता आता पुन्हा १० अंशाच्या वर गेला आहे.आज (ता. २१) मध्य महाराष्ट्रात गारठा कायम असणार आहे.उर्वरित राज्यात किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.देशभरातील थरथरणारी थंडी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत भारतातील विविध राज्यांमध्ये हवामानाचा तिहेरी हल्ला होत आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात किमान तापमान राहील. ६-१० अंश सेल्सिअस. ते मध्यम आहे. उत्तर मध्य प्रदेश आणि दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेशच्या विविध भागात तापमान सामान्यपेक्षा २-४ अंश सेल्सिअस कमी असल्याचेही सांगितले जात आहे.
२.रस्ते विकास कामांच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्याच्या विकासावर भर : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गाव, तालुका, जिल्हा यांचा विकास करण्यात येत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील विकास कामांच्या माध्यमातून तालुक्यांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे,असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.दिंडोरी तालुक्यात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या ११३ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, तालुक्याच्या विकासासाठी रुपये ११३ कोटींच्या रस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच यापुढे ही विकास कामे गतीने पूर्ण करण्यात येणार असून या विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचे ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.
३.सेंद्रिय शेतीचा प्रश्न सुटेपर्यंत केंद्राकडे पाठपुरावा करणार-शरद पवार
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा इथं महाऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अर्थात मोर्फा आणि आम्रपाली ॲग्रो टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सेंद्रिय शेती कार्यशाळेत शरद पवार उपस्थित होते.त्यावेळी ते बोलतांना म्हणालेत..
सेंद्रिय व विषमुक्त शेतीमध्ये उत्पादनाबरोबर मार्केटिंगचा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे शरद पवार म्हणाले. त्यासाठी त्याची विश्वासार्हता अत्यंत महत्वपूर्ण आहे. शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत,त्या बदलाची नोंद घेऊन आपण पावले टाकली पाहिजेत असेही शरद पवार म्हणालेत. सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी आपण संबंधित मंत्र्यांबरोबर येणाऱ्या निवडणुकांचा कालावधी संपल्यानंतर बैठका घेऊ असे पवार म्हणाले. सेंद्रिय व विषमुक्त मालाचे उत्पादन वाढवणे त्यासोबतच मार्केटिंचा विषय महत्वाचा असुन मदत करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले.
४.आता ई-पीकपाहणीची पद्धत बदलणार
आगामी खरिपापासून शहरात शेतात किंवा घरी न जाता मोबाईल फोनद्वारे ई-पीक तपासणी करण्याची सुविधा राज्य सरकारने काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात 50 मीटर गेल्याशिवाय पीक तपासणीची नोंद होणार नसल्याचे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले.ई-हार्वेस्टींग प्रकल्पाचे राज्य समन्वयक सुधांशू आणि उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांची टीम सध्या नवीन ई-हार्वेस्टींग प्रणालीचा सतत आढावा घेत आहे.“केंद्राने आता राज्यांमध्ये स्वतंत्र ई-तपासणीची प्रणाली थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार, केंद्राने आगामी खरीपापासून स्वतःची डिजिटल पीक सर्वेक्षण पद्धत लागू केली आहे. त्यामुळे सध्याची ई-पोलिंग पद्धत रद्द करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे.अर्थात, केंद्राने दिलेला अर्ज राज्याने स्वीकारला नाही.त्याऐवजी सध्याच्या ई-पीकपहानी अॅपमध्येच काही बदल करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे.
५.नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा, कांदा मार्केट सुरू होणार
नंदुरबार जिल्ह्यात पहिले कांदा मार्केट सुरू होत आहे.नंदुरबारसह नवापूर व साक्री तालुक्यात होणारेकांदा उत्पादन व होणारी कांदा आवक लक्षात घेता नंदुरबार बाजार समितीने स्वतंत्र कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.बाजार समितीत सद्य:स्थितीत जागा नसल्याने हे मार्केट साक्री रस्त्यावरील आरटीओ कार्यालयानजीक सुरू करण्यात येणार आहे.आता यामुळे कांदा उत्पादकांना मोठा पर्याय असणार आहे कांदा उत्पादक शेतकरी यांना आता स्थानिक ठिकाणीच कांदा विक्रीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.त्यामुळे स्थानिक भागात कांदा मार्केट सुरू झाल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती.त्यानसार नंदरबार बाजार समितीने कांदा मार्केट सुरू करावे,अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती.अखेर त्या मागणीची दखल घेत नंदुरबार बाजार समितीने नव्याने कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो,वेळ आणि वाहतूक खर्च देखील वाचणार आहे.
Published on: 21 January 2024, 11:44 IST