News

नवी दिल्ली: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते नवी दिल्लीत कृषी भवन इथे आज अखिल भारतीय कृषी वाहतूक सेंटरचे उद्‌घाटन झाले. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु असतांना, नाशवंत कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय वाहतुकीत काही अडथळे किंवा समस्या आल्यास, त्या सोडवण्यासाठी 18001804200 आणि 14488 हे दोन संपर्क क्रमांक यावेळी सुरु करण्यात आले. कोणत्याही मोबाईल अथवा दूरध्वनीवरुन 24 तास या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

Updated on 15 April, 2020 6:11 PM IST


नवी दिल्ली:
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते नवी दिल्लीत कृषी भवन इथे आज अखिल भारतीय कृषी वाहतूक सेंटरचे उद्‌घाटन झाले. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु असतांना, नाशवंत कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय वाहतुकीत काही अडथळे किंवा समस्या आल्यास, त्या सोडवण्यासाठी 18001804200 आणि 14488 हे दोन संपर्क क्रमांक यावेळी सुरु करण्यात आले. कोणत्याही मोबाईल अथवा दूरध्वनीवरुन 24 तास या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

राज्या-राज्यांमध्ये नाशवंत कृषीमाल म्हणजे भाज्या आणि फळे, कृषी उत्पादने, जसे की बियाणे, खते आणि कीटकनाशके यांची वाहतूक सुरळीत व्हावी या हेतूने कृषी मंत्रालयाने ही 24 तास हेल्पलाईन सुरु केली आहे. मालाची वाहतूक करणारे ट्रकचालक, व्यापारी, किरकोळ व्यापारी, वाहतूकदार, शेतकरी, उत्पादक किंवा इतर कोणीही हितसंबंधी व्यक्ती ज्यांना काही अडचणी अथवा समस्या असल्यास, या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या संपर्क कक्षात असलेले अधिकारी आपली समस्या आणि वाहनाची माहिती संबंधित राज्य सरकारांकडे पाठवतील जेणेकरुन स्थानिक प्रशासन त्यांची समस्या सोडवू शकतील.

हरयाणातील फरीदाबाद इथली इफ्को किसान समाचार लिमिटेड ही कंपनी हे कॉल सेंटर चालवणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

English Summary: Agriculture Transport Call Center numbers 18001804200 and 14488 started by the Ministry of Agriculture
Published on: 15 April 2020, 07:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)