News

कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कुलगुरू पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपन्न.

Updated on 05 September, 2022 4:55 PM IST

कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कुलगुरू पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपन्न.प्राध्यापक डॉ.दिलीप मालखेडे यांनी स्वीकारला प्रभारी कुलगुरू पदाचा प्रभार विद्यापीठाचे अतिशय अनुभवी, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय अभ्यासू कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी कार्यान्वित केलेल्या शेतकरी आणि विद्यार्थी हिताच्या विविध योजनांना अधिक सक्षमतेने साकारत शेतकरी केंद्रित व्यवस्थापनाचा अंगीकार करण्याचे सुतोवाच नवनियुक्त प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. विलास भाले यांचा कुलगुरू पदाचा पाच वर्षाचा यशस्वी कार्यकाळ आज संपन्न झाला Prof. Dr. Vilas Bhale's successful tenure of five years as Vice-Chancellor ended today आणि माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू प्रा.डॉ.दिलीप मालखेडे यांनी आज सकाळी अकोला येथील विद्यापीठाचे मुख्यालयी कुलगुरू कार्यालयात संपन्न झालेल्या समारंभात कुलगुरू पदाचा प्रभार कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्याकडून स्वीकारला. याप्रसंगी उपस्थित विद्यापीठ अधिकारी वर्गाला संबोधित

करताना कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे कार्यकाळातील अनेकानेक उपलब्धींना उजाळा देत सरांचेच पथदर्शनात या विद्यापीठाचा पुढील प्रवास हा विद्यार्थी तथा शेतकरी केंद्रित राखत शाश्वत ग्राम विकासासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचे मधील समन्वय अधिक वृद्धिंगत करीत विदर्भातील गाव खेड्यांपर्यंत कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी एकात्मिक प्रयत्नांची मोट

बांधण्यासाठी कटिबंधता व्यक्त केली. तर कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आपल्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात केलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यापीठातील सर्वच घटकांनी तन-मन-धनाने सहयोग दिला, राज्य तथा केंद्र शासनाने दिलेल्या राजाश्रयामुळे विविध उपक्रमांची अंमलबजावणी शक्य झाली तथा लोकप्रतिनिधी,विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य, प्रयोगशील - प्रगतीशील शेतकरी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधिचे सकारात्मक सहकार्यातून अकोला कृषी विद्यापीठाला

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान प्राप्त करून देता आले याबद्दल समाधान व्यक्त करीत सर्वांचेच आभार व्यक्त केले. याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक शिक्षण डॉ. शामसुंदर माने, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे,अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर,अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ.देवानंद पंचभाई, कुलसचिव डॉ.सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक श्री प्रमोद पाटील यांचे सह संत गाडगेबाबा

अमरावती विद्यापीठ अमरावती चे कुलसचिव डॉ.तुषार देशमुख, प्रा. डॉ. संजय खडसे, प्रा डॉ. संतोष बनसोड, प्रा. डॉ. राजीव बोरकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, श्री रमेश जाधव यांचे सह कृषि विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, अधिकारी -कर्मचारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी, मुख्य वसतिगृह अधीक्षक यांची उपस्थिती होती. सभेचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी केले.

English Summary: Agriculture students and farmers will strive for development:- In-charge Vice-Chancellor Prof. Dilip Malkhede
Published on: 05 September 2022, 04:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)