विषबाधा झाल्यास कोणती लक्षणे दिसून येतात व त्यावरील उपाय योजना या संदर्भात माहिती दिली. फवारणी करताना गळके फवारणी यंत्र वापरू नये. तणनाशक व किटकनाशक फवारणीसाठी वेगळ्या पंपाचा वापर करावा, सुरक्षित कपडे, हातमोजे, मास्क याचा वापर करावा. कीटकनाशके लहान मुले व गुरांपासुन दूर ठेवावीत .हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. तसेच धुम्रपान वगैरे करू नये, फवारणीचे मिक्षण काठीने ढवळावे. किटकनाशकाच्या बाटल्या वापरानंतर जमिनीमध्ये गाडून नष्ट करव्यात.
तसेच त्यावरील लाल, हिरव्या, पिवळ्या, निळ्या चिन्हाकडे लक्ष दयावे. त्यावरून रासायनातील विषयाची प्रमाण कळते व फवारणी झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करून कपडे स्वच्छ धुवावेत. यावेळी कृषीपुत्र संदानंद नंदाजी जायभाये व शेतकरी उपस्थित होते. कृषिदूताने शेतकऱ्यांना कलम बांधणीच्या पद्धती समजावून सांगितल्या तसेच यांवर मार्गदर्शन केले.कोणकोणत्या झाडांना ही पद्धत उपयुक्त ठरते हे सांगितले.व तसेच कलमं बांधणी(Grafting) करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी
तसेच त्याझाडाचे कसे संरक्षण करावे याचीही माहिती सांगितली . व प्रात्यक्षिक करून दाखवले.यावेळी कलम बांधणीचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. या पद्धतीने आपण कमी वर्षात कसे उत्पादन घेऊ शकतो .व झाडाचे विविध आजारापासून (Soil Born disease)कसे रक्षण करू शकतो याबद्दल माहिती दिली यावेळी प्राचार्य. डॉ.आर.डी.आहिरे पर राष्ट्रीय सेवा योजनचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख, कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी. व्ही. पाटील, तसेच पाटील सर, नागलोट सर. यांच्या मार्गदर्शनाखाली
दगडवाडी येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन बदनापूर कृषिदूतांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी देविदास घुगे, राजेंद्र घुगे, ओंकार घुगे सुभाष कुटे, यांची उपस्थिती होती.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 18 October 2021, 09:58 IST