News

कोरोना व्हायरसमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती. परंतु कृषी क्षेत्रामुळे अर्थव्यवस्था रुळावर येत आहे, असे वित्त अर्थमंत्रालयाकडून एका अहवालातून सांगण्यात आले आहे. मंत्रालयाकडून हा अहवाल मंगळवारी सादर करण्यात आला आहे. अहवालानुसार, मॉन्सून शक्यता बघता कोरोना व्हायरसमुळे झालेली खिळखिळी अर्थव्यवस्था उभारण्यास मदत होणार आहे.

Updated on 06 August, 2020 7:56 AM IST


कोरोना व्हायरसमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती.  परंतु कृषी क्षेत्रामुळे अर्थव्यवस्था रुळावर येत आहे, असे वित्त अर्थमंत्रालयाकडून एका अहवालातून सांगण्यात आले आहे.  मंत्रालयाकडून हा अहवाल मंगळवारी सादर करण्यात आला आहे. अहवालानुसार, मॉन्सून शक्यता बघता कोरोना व्हायरसमुळे झालेली खिळखिळी अर्थव्यवस्था उभारण्यास मदत होणार आहे.  आर्थिक प्रकरणावर काम करणाऱ्या मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या जुलैमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीच्या अहलवालात सांगण्यात आले आहे की, एप्रिलच्या संकटानंतर भारत परत रुळावर येत आहे. याला सरकार आणि केंद्रीय बँकांच्या धोरणांनी सहमती दिली आहे.

दरम्यान अहवालात कृषी क्षेत्रावर विश्वास दाखविण्यात आला आहे. २०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला कोविड-१९ च्या फटक्यापासून वाचण्यासाठी कृषी क्षेत्र मोठी भुमिका निभवणार आहे.  लॉकडाऊनमधून लवकर सूट देण्यात आल्याने रब्बी हंगामातील पिकांची कापणी वेळेवर करता आली. त्याचबरोबर खरीप हंगामाची पेरणीही वेळेवर झाली. अहवालानुसार, गव्हाची रेकॉर्डब्रेक खरेदी झाली असून शेतकऱ्यांना ७५ हजार कोटी रुपयेही देण्यात आले आहेत. यामुळे ग्रामणी भागातील अर्थव्यवस्था सुरळीत राहिली.

सप्टेंबर २०१९ पासून व्यापाराचा ओढा कृषी क्षेत्राकडे वळला आहे. यामुळे ग्रामीण भागातील वस्तूंची मागमई वाढली आहे.  यामुळे मार्च २०२० पासून ग्रामीण क्षेत्रातील चलनात वाढ झाली आहे.  कृषी क्षेत्र नियंत्रणातून मुक्त होत आहे. कृषीचा मुक्त व्यापार होत असल्याने बळीराजा  सशक्त होत आहे. दरम्यान भारतात सध्या अनलॉक करण्यात करत येत आहे.  यामुळे आता चांगला काळ येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोविडमुळे विविध राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. पंरतु वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे राज्यांमधील लॉकडाऊन कमी होताना दिसत नाही.

English Summary: Agriculture sector survives the country's economy - Ministry of Finance
Published on: 06 August 2020, 07:55 IST