कृषी क्षेत्रातील तज्ञ आणि वैज्ञानिक निरंतर कृषी क्षेत्रांमधील नवीन तंत्रज्ञान शोधत असतात. एवढेच नाही तर विविध पिकांच्या प्रजाती विकसित करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडावी यासाठी कृषी क्षेत्रातील संशोधक प्रयत्न करीत असतात.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून देशातील वैज्ञानिकांनी भाताची एक नवीन जात विकसित केली आहे. या नवीन जातीचा फार मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आय आर 64 इंडिका ही भाताच्या जातीची सर्वाधिक लागवड केली जाते. भारतीय वैज्ञानिकांनी या तांदळाच्या वानात एका वन्य प्रजातीच्या तांदळातील जनुक समाविष्ट करून एक नवे कोरे प्रगत वाण विकसित केले आहे. यामुळे निश्चितच भात उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
भाताच्या या नवीन वाणाची वैशिष्ट्ये
वैज्ञानिकांनी नवीन विकसित केलेल्या या वानाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वाणाची लागवड खाऱ्या पाण्यात देखील केली जाऊ शकते व यापासून चांगले उत्पादन देखील मिळू शकते. वैज्ञानिकांनी जंगली प्रजाती मधील जनुक यामध्ये समाविष्ट केली आहेत त्या वनस्पतीला वनस्पतीशास्त्र मध्ये पोटरेशिया कॉरक्टटा असे म्हणतात. याची शेती प्रामुख्याने बांगलादेशातील नद्यांच्या खाऱ्या पाण्याच्या मुखात केली जाते.
त्यामुळे या नवीन वाण खाऱ्या पाण्यात उत्पादन देण्यास सक्षम आहे असा वैज्ञानिकांचा दावा आहे. ही जंगले प्रजाती फक्त बांगलादेश मध्ये आढळते असे नाहीतर भारत, श्रीलंका आणि म्यानमार मध्ये देखील नैसर्गिक रित्या या तांदळाच्या प्रजाती सापडत असते.पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता येथील जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्यूटचे प्रमुख संशोधक डॉ. अरुण अरुनेंद्रनाथ लाहिरी मुजुमदार या विषयी अधिक माहिती देताना उलगडा केला आहे. ते म्हणाले की, हे नव्याने विकसित केलेली प्रजाती 200 मायक्रो मोल प्रति लीटर पर्यंतच्या खाऱ्या पाण्यात देखील त्याचे यशस्वी उत्पादन घेतले जाऊ शकते. समुद्राच्या पाण्यात मिठाचे प्रमाण हे जवळपास 480 मायक्रोमोल प्रतिलिटर असते. याचा अर्थ समुद्रापेक्षा निम्मे जरी खारे पाणी असले तरीदेखील या भाताच्या वानाची अशा पाण्यात लागवड करता येणे शक्य होणार आहे. निश्चित त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
त्यामुळे ज्या भागात अधिक पाणी खारट आहे अशा भागात भाताची वाणाची लागवड फायदेशीर ठरू शकते.(स्रोत-प्रहारकोकण)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:राज्यात ५० लाख टन अतिरिक्त उसाचा प्रश्न, भाजप किसान मोर्चा सरकारवर आक्रमक
Published on: 05 May 2022, 02:33 IST