सध्या देशात कोरोनाची लहर चालू आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून देशात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आला, या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या हातातून काम गेले. शहरात मजुरी करणारे, कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाऱ्या लोकांना आपल्या गावाकडे परतावं लागलं. गावात आल्यानंतर प्रत्येकांना शेतीची काम येतात असं नाही, किंवा प्रत्येकाकडे शेती आहे असं नाही. त्यामुळे अनेकांच्या पुढे पोट भरण्याचा प्रश्न निर्माण होत आहे, अशा व्यक्तींसाठी आम्ही या लेखातून एक महत्त्वपूर्ण माहिती देत आहोत.
या लेखात कृषी संबंधित व्यवसायाची माहिती देत आहोत, या माहितीच्या आधारे तुम्ही व्यवसाय सुरू करू शकतात. दरम्यान देशातील बहुतेक नागरिकांनी हे व्यवसाय आपआपल्या भागात सुरू केले आहेत आणि लाखो रुपये कमावत आहेत.
ऑर्गेनिक फार्मिंग
जकल लोग कई बीमारियों से ग्रस्त हो रहे हैं. इसके पीछे सबसे बड़ी वजह खेतों में रासायनिक खाद्यों का इस्तेमाल है. शेतात पिकवला जाणारा भाजीपाला रासायनिक घटक टाकून पिकवला जातो. त्याचवेळी मनुष्य प्राणी सध्या अनेक आजारांनी ग्रासलेला आहे. निरनिराळे आजारांची लागण मनुष्याला होत आहे. यामुळे आपला आहार पौष्टीक कसा राहिल याकडे सर्वजण लक्ष देत आहेत. ही जाणीवेतून सध्या प्रत्येकजण सेंद्रीय शेतीतून पिकलेला भाजीपाला मागत आहे. सध्या बाजारात ऑर्गेनिक फार्मिंगला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. सेंद्रीय शेतातील इतर भाजीपाला आणि इतर शेती पिकांना बाजारात खूप भाव देखील मिळतो.
खतांचे आणि बि-बियाणांचे दुकान
शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी बियाण्यांची गरज नेहमी असते. त्याचबरोबर खतांची गरज लागत असते. पिकांच्या पोषक वाढीसाठी खते आवश्यक असतात. यामुळे तुम्ही गावात खते आणि बि-बियाण्यांची दुकाने चालवू शकतात. विशेष म्हणजे हे दुकाने सुरू करण्यासाठी सबसिडी देखील मिळत असते.
कोल्ड स्टोरेज - शीतगृहे सुरू करणे
गावोगावी शीतगृहे कोल्ड स्टोरेजची सुविधा अद्याप नाही. अनेक शेतकऱ्यांकडे शेतातील माल बाजारात नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसते. शेतातून अधिकचा भाजीपाला निघाला तर शेतकऱ्यांकडे तो माल ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची यंत्रणा नसते. त्यावेळी ही शीतगृहे कामात येतात. यातून सुद्धा तुम्ही पैसे मिळवू शकतात.
पॉल्ट्री फार्मिंग आणि लाइवस्टोक फार्मिंग
गाय म्हैशी, शेळ्या, कोंबडी यांच्या व्यापारातून मोठा नफा शेतकऱ्यांना मिळत असतो. पोल्ट्री व्यवसाय हा सर्वात भारी शेतीसाठी जोडव्यवसाय आहे. त्यानंतर पशुपालनाचा व्यवसाय यातून तुम्हाला शेणखत, दूध मिळत असते.
Published on: 23 January 2022, 10:53 IST