जर आपण कृषी संबंधित क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा बाळगत असाल आणि आपल्याकडे योग्य पात्रता असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्रामिण विकास आणि पंचायत राज विभागाच्या तांत्रिक सहाय्यक (वनीकरण / शेती / फलोत्पादन / रेशीम) च्या जागेसाठी अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार या पदासाठी इच्छुक आहेत ते या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या पदांची माहिती आणि अर्ज भरू शकता. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
पदांचा तपशील -
(Name of Post) पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant)
(Total Post) पदांची संख्या : 407 पद
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) (वनीकरण): 125
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) (कृषि / फलोत्पादन / रेशम)- 282
नोकरीचे ठिकाण (Job place) - कर्नाटक
महत्वपूर्ण तारखा (Important Dates) -
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - २० एप्रिल २०२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ मे २०२०
शैक्षणिक पात्रता (Education Eligibility) -
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) (वनीकरण): अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थाकडून बी.एससी (वनीकरण) पदवी असणे आवश्यक आहे.
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) (कृषि / फलोत्पादन / रेशम): या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून अॅग्री / फलोत्पादन / रेशीम पालन / दुग्धशास्त्रात बीएससी पदवी असणे आवश्यक आहे. तरच ते या पदांसाठी अर्ज करू शकतात.
(Age Limit) वयाची पात्रता
या पदांवर अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे ते कमाल 40 वर्षे निश्चित केले गेले आहे.
(How to apply) अर्ज कसा करायचा - इच्छुक उमेदवार कर्नाटक ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागातील तांत्रिक सहाय्यक भरतीसाठी https://bit.ly/3btUcbr या लिंकवर क्लिक करुन अर्ज करू शकतात.
Published on: 23 April 2020, 05:57 IST