News

LiGHT अकोला जुन २०२१ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे स्थापन करण्यात आले. हे गोपाली युथ वेलफेयर सोसायटीच्या १६ केंद्रापैकी एक आहे. कार्यक्रमाचे नियोजन करताना एका आठवड्या आधी केंद्र सदस्यांनी ग्रामपंचायत बाभुळगाव येथे जाऊन सरपंच सुशिल यांच्याकडून संमती घेतली.

Updated on 14 June, 2023 11:12 AM IST

LiGHT अकोला जुन २०२१ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे स्थापन करण्यात आले. हे गोपाली युथ वेलफेयर सोसायटीच्या १६ केंद्रापैकी एक आहे. कार्यक्रमाचे नियोजन करताना एका आठवड्या आधी केंद्र सदस्यांनी ग्रामपंचायत बाभुळगाव येथे जाऊन सरपंच सुशिल यांच्याकडून संमती घेतली.

शेतकऱ्यांना कृषीसंबंधी योजनांची माहिती देण्याकरिता कृषी तंत्रज्ञान प्रसारक व उद्योजक निखिल यादव सर यांना आमंत्रित करण्यात आले. कृषोन्नती या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना कृषीसंबंधीत संपुर्ण योजनांची माहिती असावी आणि त्यांना योजनांचा योग्य तो लाभ मिळवा हा होता.

कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषीसिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, कृषीयांत्रिकीकरण, उपअभियान इत्यादी योजनाची माहीती देण्यात आली.

लंपी रोगामुळे पांगरा येथे अनेक जनावरे दगावली,शासकीय पशुसंवर्धन खात्याच्या डाॅक्टरांचे दूर्लक्ष

त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टल (Maha DBT Shetkari Portel Yojna) यावर अर्ज भरण्या संबधी मार्गदर्शन देण्यात आले. शेतकरी मित्रांना विविध केंद्रीय व राज्य सरकार योजनान बाबत सकारात्मक माहिती देण्यात आली.

शेतकरी महिला सुद्धा ह्या कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांना बचतगट योजना, लहान कृषि पूरक व्यवसाय तसेच रोप वाटिका संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचा जवळपास १०० शेतकर्‍याना लाभ झाला.

८५० रुपयांची कापसाची बॅग तब्बल 2300 रुपयांना, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार आला समोर...

संपूर्ण ग्राम सदस्यांनी आणि गावकर्‍यानी उपक्रमाला उत्तम पांठिबा दिला. कार्यक्रमाच्या शेवटीला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या व त्यांच्या अडचणी संबंधी प्रश्न केले आणि त्यांच्या प्रश्न आणि अडचणीविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. एकंदरीत हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हितार्थ राबविण्यात आला.

गुजरातमध्ये येत असलेल्या ‘बिपरजॉय’ वादळाचा सामना करण्यासाठीच्या केंद्र सरकार सज्ज, अनेकांना सुरक्षित स्थळी हलवले..
राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना 1500 कोटींच्या मदतीची घोषणा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देणार..
राज्यातील धरणांनी गाठला तळ, पावसाने फिरवली पाठ...

English Summary: Agriculture Promotion' program of members of LiGHT Akolya at Babulgaon successful
Published on: 14 June 2023, 11:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)