News

Basmati Rice Update : भारताच्या बासमती तांदळाला "जगातील सर्वोत्तम तांदूळ" म्हणून गौरवण्यात आले आहे. टेस्ट अॅटलसने २०२३-२४ च्या वर्षअखेरीच्या पुरस्कारांचा भाग म्हणून या सन्मानाची घोषणा केली. टेस्ट अॅटलसने त्यांच्या सोशल मिडीयाच्या अकाउंटवरुन अर्थातच इन्स्टाग्रामवरुन फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.तसंच फोटोच्या खाली त्यांनी काही माहिती लिहिली आहे.

Updated on 17 January, 2024 5:15 PM IST

१) राज्यात तापमान घटल्याने थंडीचा जोर वाढणार

उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये हवामानाची स्थिती बिकट होत चालली आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये दाट धुके आणि थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, चक्रीवादळ वाऱ्याचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येईल. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडेल. तीव्र थंडीच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये तापमान ६ ते १० अंशांवर राहण्याची शक्यता आहे.उत्तर भारतासह महाराष्ट्रातील वातावरणात देखील बदल झालेला आहे. राज्याच्या बहुतांश भागातील तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे. यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

२) भारताचा बासमती जगात एक नंबर

भारताच्या बासमती तांदळाला "जगातील सर्वोत्तम तांदूळ" म्हणून गौरवण्यात आले आहे. टेस्ट अॅटलसने २०२३-२४ च्या वर्षअखेरीच्या पुरस्कारांचा भाग म्हणून या सन्मानाची घोषणा केली. टेस्ट अॅटलसने त्यांच्या सोशल मिडीयाच्या अकाउंटवरुन अर्थातच इन्स्टाग्रामवरुन फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.तसंच फोटोच्या खाली त्यांनी काही माहिती लिहिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, "बासमती ही मूळतः भारत आणि पाकिस्तानमध्ये उगवलेली आणि लागवड केली जाणारी लांब-दाण्याचा तांदूळ प्रकार आहे. तांदळाचे वैशिष्ट्य त्याची चव आणि सुगंधाने वैशिष्ट्यीकृत आहे, जे अतिशय पौष्टिक, खमंग आहे. तसंच किंचित मसालेदार आहे. एकदा तांदूळ शिजल्यानंतर तो एकमेकांना चिकटत नाही. ज्यामुळे त्याला विविध खाद्यपदार्थांच्या रेसीपीमध्ये आणि त्याचे खास पदार्थ करताना वापरला जातो. तांदूळ नावाचे हे धान्य जितके लांब तितकेच चांगले मानले जाते आणि सर्वोत्तम बासमती धान्यांचा रंग किंचित सोनेरी असतो."


३) उजनी धरणात ९ टक्के पाणीसाठा; शेतकरी चिंतेत

यंदा सोलापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या धरणात अवघे ९ टक्के पाणी आहे. सध्या उजनी धरणातून सोलापूर महापालिकेसह पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा नगरपालिकेला पिण्यासाठी ५ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात धरणात १०० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी हाच पाणीसाठा फक्त १० टक्केच्या आत आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सोलापूरची तहान भागवण्यासाठी धरणातून ५ टीएमसी पाणी सोडावे लागते. हे पाणी सोलापूरकरांना केवळ ५० दिवस पुरणार असल्याने पुढे सोलापूर करांना पाणी कायम द्यावे लागणार आहे. यामुळे प्रशासनाची आता पासून पाणी व्यवस्थापनाबाबत चिंता निर्माण झाली आहे.

४) दुष्काळाचे अनुदान तातडीने देण्यात यावे, शेतकऱ्यांची मागणी

कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने मैदानात उतरत असते. मागील काही दिवसांपासून सोयाबीन आणि कापूस दराचा मुद्दा स्वाभिमानीने उचलून धरला आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे दुष्काळ परिषद आणि कापूस, सोयाबीन उत्पादकांचा शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मका पिकाला ३ हजार रूपये हमीभाव देण्यात यावा, शेतीला दिवसा १२ तास वीज मिळावी, खडकपुर्णा धरणातील पाणी जाफराबाद व भोकरदान तालुक्याला देण्यात यावे , दुष्काळाचे अनुदान तातडीने देण्यात यावे अशा विविध मागण्या मेळाव्यात मांडण्यात आल्या. या मेळाव्यासाठी जाफराबाद,भोकरदन तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसंच या मेळाव्याला शेतकरी नेते राजू शेट्टी देखील उपस्थित होते.

५) मृदा सर्वेक्षण, जमीन उपयोग नियोजनाबाबत सादरीकरण

महाराष्ट्रातील मृद सर्वेक्षण करुन एकत्रित माहिती संकलित करण्याच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये जमीन उपयोग नियोजन संस्थेने अर्थातच (ICAR) माती परिक्षणाबाबत संस्थेचे संचालक नितीन पाटील यांनी सादरीकरण केले. यावेळी कृषी विकास दर वाढवण्यास मातीची गुणवत्ता व पोषकता महत्त्वाची असून यासाठी मृदा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. मृदा सर्वेक्षण आणि जमीन उपयोग नियोजन याबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी सर्व संबधित विभागांच्या मुख्य सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावे, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री राठोड यांनी दिल्यात.

English Summary: Agriculture News 5 important of the day know in one click
Published on: 17 January 2024, 05:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)