News

water Stock News : अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट आलं आहे. तर उजनी धरणातील पाणीसाठा आता मृतसाठ्यात गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळाला सामोरे जावे लागणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने धरण केवळ ६० टक्के भरल्याने धरणात केवळ ९५ टीएमसी पाणीसाठा होता.

Updated on 23 January, 2024 3:46 PM IST

१) राज्यात पुन्हा गारठा वाढणार; काही ठिकाणी अवकाळी शक्यता

राज्यातील वातावरणात मागील काही दिवसांपासून बदल होत आहे. तापमानात देखील चढ-उतार सातत्याने पाहायला मिळत आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर हवामान खात्याने राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आलेत. तसंच मुंबई, पुण्यासह, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये तापमानात घट नोंदवली आहे. यामुळे थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

२) उजनी लगतच्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट, धरण मायनसमध्ये

अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट आलं आहे. तर उजनी धरणातील पाणीसाठा आता मृतसाठ्यात गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळाला सामोरे जावे लागणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने धरण केवळ ६० टक्के भरल्याने धरणात केवळ ९५ टीएमसी पाणीसाठा होता. यामुळे हा पाणीसाठा जानेवारी महिन्यातच मृतसाठ्यात गेला आहे. गतवर्षी उजनी धरण जानेवारी महिन्यात १०० टक्के भरलेले होते. पण यंदा ही स्थिती उलटी झाली आहे. यंदा धरणात एकूण ९५ टीएमसी पाणीसाठा होता. पण यातील उपयुक्त पाणीसाठा केवळ ३२ टीएमसी होता. आणि उर्वरित मृतसाठा ६३ टीएमसी होता. यामुळे उपयुक्त पाणीसाठा सध्या संपल्याने धरणात आता मृतसाठा आहे. यामुळे आता उजनी परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.


३) देशातील १९९ जिल्हा कृषी हवामान केंद्रे बंद होणार

देशात 2018-19 साली जिल्हा कृषी हवामान केंद्र भारतीय हवामान विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या समन्वयाने उभारण्यात आली आहेत. त्यावेळी देशातभरात एकूण 199 केंद्रे उभारण्यात आली असून राज्यात 11 केंद्रे उभारण्यात आली आहेत. या हवामान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हवामानाची संपूर्ण माहिती मिळत आहे. पण आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान खात्याच्या परीपत्राकानुसार देशातील ही 199 केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

४) पंतप्रधान मोदींकडून प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा

अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली आहे. देशवासीयांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली आहे. यासाठी केंद्र सरकारने सुमारे एक कोटी घरांच्या छतावर रुफटॉप सोलर बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सोमवारी अयोध्येहून परतताना पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम देशवासीयांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


५) राजस्थानमध्ये सर्वाधिक बाजरीचं उत्पादन

२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून साजरे करण्यात आलंय. त्यामुळं देशातील शेतकरी आणि लोकांमध्ये भरडधान्य लागवडीकडे आकर्षण वाढत आहे. या बाजरी पिकाचं सर्वाधिक जास्त उत्पादन राजस्थानमध्ये घेतले जात आहे. बाजरीच्या लागवडीसाठी येथील हवामान आणि माती खूपच चांगली आहे. त्यामुळे बाजरीचे सर्वाधिक उत्पादन राजस्थानमध्ये होते.

English Summary: Agriculture News 5 important news of agriculture know in one click
Published on: 23 January 2024, 03:46 IST