News

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी बाबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाबू लागवड केल्यास ७ लाख रुपये हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून सरकारने शेतकऱ्यांसाठी बाबू लागवड वाढवण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत.

Updated on 16 January, 2024 4:51 PM IST

१.पुण्यात १७ जानेवारीपासून ‘मिलेट महोत्सव’; कृषी पणन मंडळाकडून महोत्सवाचे आयोजन

कृषी पणन मंडळाच्यावतीने आयोजित ‘मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-२०२४’ चे उद्घाटन १७ जानेवारी रोजी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुणे येथे होणार आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट पुणे येथे १७ ते २१ जानेवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेअंतर्गत विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा यामागील उद्देश आहे.या महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, तृणधान्य प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या सहभागी होणार आहेत. या उत्पादकांना सुमारे ५० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


२.बांबु लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार ७ लाख रूपये अनुदान

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी बाबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाबू लागवड केल्यास ७ लाख रुपये हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून सरकारने शेतकऱ्यांसाठी बाबू लागवड वाढवण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. बांबू लागवडीमुळे पर्यावरणाला मोठा फायदा होईल, असा सरकारचा विश्वास आहे. याशिवाय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल आणि हवेचा दर्जाही सुधारेल. यामुळे सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे.महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन करत आहे. शेतकऱ्यांनी बाबूची लागवड केल्यास त्यांना हेक्टरी ७ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. मुंबईत झालेल्या पर्यावरण शाश्वतता शिखर परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमात विविध देशांतील संशोधक आणि बांबू तज्ज्ञ सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोदरेज उद्योग समूहाचे नादिर गोदरेज आणि पर्यावरण व हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.

३.रविकांत तुपकरांनी दिला ‘रेल्वे रोको’आंदोलनचा इशारा

‘मागील काही महिन्यांपासून आपण शेतकऱ्यांसह रस्त्यावर लढत आहोत. मात्र निवडणूक अभियान राबविणारे मुख्यमंत्री असो वा अन्य सत्ताधारी नेते असो, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सवड नाही. यामुळे आमचा संयम संपला असून शुक्रवारी (ता. १९) ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्यात येईल,’’ असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला.जिल्ह्यात मिसाळवाडी येथे शनिवारी (ता.१३)रात्री शेतकरी, कष्टकरी, मजूर व तरुणांचा परिवर्तन एल्गार मेळावा झाला. या वेळी गावकऱ्यांनी तुपकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी १ लाख रुपये लोकवर्गणीचा धनादेश दिला. या वेळी तुपकर यांनी नवीन आंदोलनाची घोषणा केली.तुपकर म्हणाले, ‘‘झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडवून शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवणार आहोत. मागील ऑक्टोबरपासून सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी विविध टप्प्यात आंदोलने करीत आहे.

४.तुरीचा भाव वाढण्याची शक्यता

तुर उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमीय.तूर हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. याची शेती खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते.राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे या पिकावर अवलंबित्व आहे. मात्र सध्या स्थितीला तुरीचे भाव दबावत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी तुरीचे दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते.सध्या स्थितीला मात्र बाजारभावावर मोठा दबाव पाहायला मिळत आहे. पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे.अशातच यावर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने ८ ते १० लाख टन तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे पुढील काही दिवसांत तुरीचे दर ११ हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यापारी व अभ्यासकांनी वर्तविली आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात तुरीचे भाव वाढणार आहे.

५.अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

येण्याऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय.. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे..टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार केंद्र सरकार,पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ करण्याची तयारी करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे.केंद्र सरकार २००० रुपयांचे चार हप्ते अथवा ३००० रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे. तर महिला शेतकऱ्यांच्या खात्यात याहून अधिक लाभ देण्याचा विचार करण्यात येत आहे.या वृत्तानुसार,महिला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान अतंर्गत १२००० रुपये जमा होऊ शकतात.

English Summary: Agriculture News 5 important news of agriculture in the state
Published on: 16 January 2024, 04:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)