News

Banana News : खानदेश पट्ट्यातच केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. खानदेशात मागील आठवड्यापासुन केळीची आवक काहीशी वाढली आहे.केळीची आवक वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत.सद्या केळीचा दर १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलवर आहे.दर हा स्थिर असुन सध्या प्रतिदिन ३१ ट्रक केळीची आवक होत आहे. केळीला उत्तरेकडे उठाव असल्याने दरही टिकून असल्याचे पाहायला मिळत आहेत.

Updated on 05 February, 2024 6:05 PM IST

१.लसणाचा दर किलोमागे ४०० रुपयांवर

लसणाच्या दरात सद्या मोठ्या प्रमाणात झपाट्यानं वाढ होत आहे.दिवसें दिवस महागाई खूप वाढत आहे.सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे.भुवनेश्वरच्या बाजारात लसणाचे भाव ४०० रुपये किलोवर पोहोचला होता खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेच प्रमुख कारण आहे.पिकाच नुकसान झाल्यामुळं दुसऱ्या पिकाची लागवड करण्यास वेळ लागला. त्यामुळे नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब होत आहे.अनेक भागात लसणाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं दरात वाढ होत आहे.या महिन्यात किंमती कमी होण्याची शक्यता आहे.परंतु सद्या लसणालान १ किलो लसणासाठी ४०० रूपये मोजावे लागत आहे.

२.केळीच्या आवकेत वाढ ,दर मात्र स्थिर

खानदेश पट्ट्यातच केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. खानदेशात मागील आठवड्यापासुन केळीची आवक काहीशी वाढली आहे.केळीची आवक वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत.सद्या केळीचा दर १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलवर आहे.दर हा स्थिर असुन सध्या प्रतिदिन ३१ ट्रक केळीची आवक होत आहे. केळीला उत्तरेकडे उठाव असल्याने दरही टिकून असल्याचे पाहायला मिळत आहेत. घड थंडीत पक्व होत नसल्याने अनेक बागांमधील काढणी सुरू झालेली नाही. तापमानात जशी वाढ होईल, तशी केळीची आवक वाढेल .तर यंदा केळीचा दर १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलवर असुन दर्जेदार किंवा निर्यातीच्या केळीचे दर २३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

३. सरकारला जाब विचारणं माझं कर्तव्य- डॅा.अमोल कोल्हे

संसदेत शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नांवर खा.डॉ.अमोल कोल्हे सरकारवर कडाडले.खासदार अमोल कोल्हे यांनी एक ट्विट केलय.. एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सरकारला जाब विचारणं माझं कर्तव्य आहे अस ते म्हणालेत.पुढे ते म्हणतायेत.माझा बळीराजा काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतो, चोरी - चपाटी, लबाडी त्याला जमत नाही. बळीराजाच्या या भाबडेपणाचा गैरफायदा घेत भाजपने त्यांना फसवलं, आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू म्हणत त्यांची मतं घेतली आणि सत्तेत आल्यानंतर काय केलं ?? सत्तेत आल्या नंतर का

४.राज्याच्या किमान तापमानात वाढ

राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात गारठा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहणार असुन अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १४ ते २४ अंशादरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगालमध्ये किमान तापमान ९ ते १२ अंशांदरम्यान आहे.तर आता राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असुन राज्यात गारठा कमी झाले आहे.किमात तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय..


५.पीक कर्ज वाटपात पुणे जिल्ह्याचा विक्रम

पीककर्ज वाटपामध्ये पुणे जिल्ह्याने सलग तिसऱ्या वर्षी उच्चांक गाठला आहे. २०२३-२४ या वर्षात ३१ डिसेंबर अखेर ५ हजार ७६३ कोटी रुपये इतके पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकाराने सर्व बँकांना पीक कर्जासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. गतवर्षी ५ हजार २० कोटी रुपये तर २०२१-२२ मध्ये ३ हजार ८९३ कोटी पीककर्ज वाटप जिल्ह्यात झाले होते. यावर्षी पीक कर्जासाठी राबविण्यात आलेल्या अभियानामुळे ३१ डिसेंबर अखेर ५ हजार ७६३ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

English Summary: Agriculture News 5 important news of agriculture in the state know in one click (1)
Published on: 05 February 2024, 06:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)