News

१.राज्यातील तापमानात घट; थंडीचा कडाका वाढला २.मिरचीचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत 3.पेट्रोल आणि डिझेलच्या दर 10 रुपयांनी कमी होण्याची शक्यता ४.मंगळवेढ्यात सेंद्रिय शेती शेतकऱ्यांची कार्यशाळा ५.शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न -पणन मंत्री अब्दुल सत्तार

Updated on 18 January, 2024 3:22 PM IST

१.राज्यातील तापमानात घट; थंडीचा कडाका वाढला

उत्तर भारतात थंडीची लाट अद्यापही कायम आहे.याचबरोबर राज्यातील तापमानात देखील त्याचा परिणाम झाला आहे.राज्यातील तापमानात घट झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. हा थंडीचा जोर पुढे कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. बुधवारी जळगावात ९ अंशांच्या किमान तापमानाची नोंद झाली तर राज्याच्या काही भागांमध्ये मात्र किमान तापमान अंशत: वाढलं आहे.मागील दोन दिवसांपासून राज्यातील तापमानात चांगलीच घट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तसंच पुढील तीन ते चार दिवस ही थंडी कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. येत्या काही काळात उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

 

२.मिरचीचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत

मिरचीची बाजारपेट म्हणून नंदूरबारला ओळखले जाते.नंदुरबार बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत.नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतीत यंदा मिरचीची विक्रमी आवक आली आहे.आतापर्यंत दोन लाख क्वींटल मिरच्यांची खरेदी येथे झाली आहे. पुढील दीड महिने मिरच्याचा आवक सुरुच रहाणार असल्याचा अंदाज आहे. मिरचीचा पुरवठा वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे.आधीच यंदाच्या अनियमित पावसाने शेतकरी आधीच संकटात असताना आता मिरचीच्या विक्रीतून खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले .सध्या मिरचीला दोन ते चार हजार रुपयांचा दर मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.मिरचीच्या लागवडीसाठी त्यानंतर फवारणी आणि काढणी तसेच वाहतूकीचा खर्च मोठा आहे..

३.पेट्रोल आणि डिझेलच्या दर १० रुपयांनी कमी होण्याची शक्यता

महागाई मुळे सर्वसामान्य त्रस्त झालाय.त्यातच महागाईचा मार सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तब्बल १० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.सरकारी तेल कंपन्या दर कपात करण्याचा विचार करत आहेत.२०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. या वर्षात मतदारांना आकर्षित करण्यासाठी,महागाई नियंत्रीत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.त्याासठी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम करतय.. महागाई रोखण्यासाठी सरकारनं विविध उपाययोजना राबवल्या आहेत.आता अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील कमी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दर १० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या दिलासा सर्वांना मिळणार आहे.

४.मंगळवेढ्यात सेंद्रिय शेती शेतकऱ्यांची कार्यशाळा

१९ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.आणि माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे हे देखील असणार आहेत..१९जानेवारीला दुपारी दीड वाजता शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंद्रिय शेती शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.या कार्यक्रमात शरद पवार शेतकऱ्यांना मार्गदर्श करणार आहेत.महाऑरगॅनिक अँड रेश्यूड्युफ्री फार्मर्स असोसिएशन अर्थात मोर्फाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला सोलापुरात दौऱ्यावर येतायत.नरेंद्र मोदी सोलापूर शहरात १९जानेवारी रोजी त्यांचा रोड शो आणि रे कॉलनीच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवेढा येथे कार्यक्रम घेतल्याने सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलचं तापलय..

५.शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न -पणन मंत्री अब्दुल सत्तार

राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट, सक्षम व्हावी याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार दिली.बालेवाडी येथे आशियाई विकास बँक योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थेच्यासाठी आयोजित तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, उप प्रकल्प संचालक नितीन पाटील, आशियाई विकास बँकेचे क्रिशन रौटेला, राघवेंद्र नदुविनामनी, केपीएमजीच्या सहयोगी संचालक मेघना पांडे, विविध शेतकरी उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी आदी उपस्थित होतेपणन मंत्री श्री. सत्तार म्हणाले, राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे, त्यांच्या शेतमालाला देश व विदेशात योग्य प्रकारे भाव मिळाला पाहिजे, नाशवंत मालाला मंदीच्या काळात साठवणूक करता यावी, शेतीमालाची आयात-निर्यात सुलभरित्या करता यावी यासाठी शेतकरी हिताचे कायदे तयार करण्यात येत आहेत. विद्यमान नियमात काळानुरूप बदलही करण्यात येत आहेत.

 

English Summary: Agriculture News 5 important agriculture news of the day know in one click
Published on: 18 January 2024, 03:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)