News

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.

Updated on 26 January, 2024 6:25 PM IST

१.प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
२.राज्यात थंडीचा जोर वाढला; तापमानात घट
३.तुरीच्या उत्पादनात घट ,तुरीला मिळतोय चांगला दर
४.कांदा दरात घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त
५.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील – उपमुख्यमंत्री अजित पवार


१.प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.

२.राज्यात थंडीचा जोर वाढला; तापमानात घट

उत्तर भारतात वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाले आहे. तर उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. मात्र आता राज्यातील वातावरणात बदल झाल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याच पाहायल मिळत आहे. तसंच अनेक भागातील तापमान १० अंशाच्या खाली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट चांगलीच वाढली आहे.उत्तर भारतातील थंडीची लाट आता महाराष्ट्रात पोहचली आहे. यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा पारा ९ अंशांच्या खाली आला आहे. यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात किमान तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्याच वेळी, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहारच्या बहुतांश भागात किमान तापमान ६ ते १० अंश सेल्सिअस दरम्यान आहे.


३.तुरीच्या उत्पादनात घट ,तुरीला मिळतोय चांगला दर

सद्या बाजारात अनेक पिकांच्या दरात चढउतार झाल्याच पाहायला मिळतय..त्यातच नुकतेच तुर उत्पादक शेतकऱ्यांवर चांगले दिवस आहेत.तुरीच्या दरात दिवसेंदिवस वाढ झाल्याचा पाहायला मिळतय.त्यामुळे सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत.त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे तुरीच्या दरात चांगलीच सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे.वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीमध्ये काल नवीन तुरीनं 10785 रुपयांचा टप्पा पार केलाय... तुरीच्या दरात वाढ झाल्यामुळं तुर उत्पादक शेतकरी आनंदी आह्त.तूर पिकाच्या उत्पन्नात यावर्षी मोठी घट झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा तुरीच्या भावात सुधारणा होताना पाहायला मिळत आहे.तुरीने काल १०००० हजार रूपयांचा टप्पा पार केल्यानंतर तुरीचे वाढते दर पाहून तूर उत्पादक शेतकरी आनंदी झाले आहेत. दरम्यान तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

४.कांदा दरात घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त

सद्या बाजारात गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याचे दर घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे.कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. निर्यातबंदीच्या निर्णयापूर्वी चार हजारांवर असणारे कांद्याचे दर आता हजाराच्या खाली आले आहे.नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी आता हजार ते १२०० रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कांदा पिकातून शेतकऱ्यांना साधा उत्पादन खर्चही निघत नाहीये.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.काही ठिकांनी तर कांद्याला किलोमागे 1 ते 2 रुपयेपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.


५.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील – उपमुख्यमंत्री अजित पवार

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा माल निर्यात करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यासंबंधित असलेले प्रश्न तातडीने सोडविले जातील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील हस्ताई ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या एकात्मिक कोल्ड पॅक हाऊस व कोल्ड स्टोरेजच्या उद्घाटन प्रसंगी केले.उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, बांग्लादेशने द्राक्ष आयातीवर अतिरिक्त कर लावले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या देशात द्राक्ष निर्यात करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्या अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्नही केंद्रीय गृह मंत्री व वाणिज्य मंत्री यांच्याशी चर्चा करून सोडविण्यात येतील.शेतकऱ्यांना वीज, पाणी, पायाभूत सुविधा, बी- बियाणे, यंत्र सामुग्री आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जुन्नर तालुक्यात पर्यटनाला चालना देण्यासाठीही प्रयत्न केले जातील. हस्ताई ॲग्रो प्रोड्युसर कंपनी द्राक्षासह अन्य फळ उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरणार असून उत्पादित केलेली फळे कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून सुरक्षित ठेवता येतील. योग्य भाव आल्यास बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवता येतील, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

English Summary: Agriculture News 5 important agriculture news of the day agri news marathi
Published on: 26 January 2024, 06:25 IST