शेतमाल तारण कर्ज योजना हीशेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे.शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल तारण ठेवून त्यावर कर्ज घेता येते. या लेखात आपण शेतमाल तारण कर्ज योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊ.
शेतमाल तारण कर्ज योजनेचे प्रमुख उद्दिष्ट
- शेतकऱ्यांना असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच त्यातून निघालेला शेतमाल साठवणुकीसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीमाल बाजारात आणतात आणि बाजारात अचानक आवक वाढल्याने शेतमालाचे भाव गडगडतात.परंतु या योजनेअंतर्गत शेतात पिकवलेला शेतमाल काही काळ साठवून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्याला चांगला भाव मिळतो. या दृष्टिकोनातून शेतकर्यांना शेतमालासाठी चांगला भाव आणि पर्यायाने त्यांना नफा मिळावा या एका दृष्टिकोनातून शेतकरी तारण कर्ज योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
शेतमाल तारण कर्ज योजना मध्ये कोणत्या शेतमालाचा समावेश आहे
शेतमाल तारण योजना अंतर्गत कर्जसाठी मूग, बेदाना, सोयाबीन, गहू, उडीद,चना बाजरी,काजू बी आणि हळद इत्यादी शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे. योजना बाजार समिती मार्फत राबवली जाते. शेतमाल तारण ठेवून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड सहा महिन्याच्या आत करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याजदर सवलत देण्यात येते.
शेतमालाचा प्रकार व त्यानुसार कर्जाची मुदत व व्याजदर
- शेतमालप्रकार–मका, ज्वारी, बाजरी आणि गहू
कर्जाचीमर्यादा– एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ( 500 रुपये प्रति क्विंटल किंवा प्रत्यक्ष बाजार भाव यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम)
मुदत– सहा महिने
व्याजदर- सहा टक्के
- शेतमाल प्रकार – सोयाबीन, तुर, सूर्यफूल,उडीद, करडई, भात,मुग, हळद, चना
कर्ज वाटपाचे मर्यादा – प्रत्यक्ष बाजारभावानुसार किमतीच्या 75 टक्के रक्कम
मुदत – सहा महिने
व्याजदर – सहा टक्के
- शेतमाल प्रकार – बेदाणा
कर्ज मर्यादा – एकूण किमतीच्या कमाल 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 50 हजार प्रति मेट्रिक टन यातील कमी असणारी रक्कम
मुदत सहा महिने व्याज दर सहा टक्के
या योजनेच्या अटी
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा शेतीमाल स्विकारला जातो.
- या योजनेअंतर्गत व्यापार यांचा मार्ग स्वीकारला जात नाही.
- शेतकऱ्याने बाजार समितीकडे तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक, देखभाल व सुरक्षा जबाबदारी संबंधित बाजार समितीच्या असणार आहे.ती विना मूल्य आहे.
- शेतकऱ्याने तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाचे चालू बाजार भाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जे कमी असेलतीठरवण्यात येते.
- कर्जासाठी तारण ठेवलेल्या शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी ही त्या संबंधित बाजार समितीच्या असणार आहे
कर्जाची परतफेड मुदत आणि व्याजदर
- शेतमाल तारण कर्ज योजनेच्या कर्जाची परतफेड सहा महिने म्हणजे 180 दिवस असून तारण कर्जास व्याजाचा दर 6 टक्के आहे.
- बाजार समिती कडून कृषी पणन मंडळास तीन टक्के प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड ठरवून दिलेल्या मुदतीत कर्ज न फेडल्यास व्याज सवलत शेतकऱ्याला मिळणार नाही.
- मुदतीनंतर सहा महिन्यांपर्यंत आठ टक्के व्याज दर व त्यापुढील सहा महिन्यांकरिता 12 टक्के व्याजदर आकारला जातो.
Published on: 06 October 2021, 01:41 IST