News

महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः मेटाकुटीला आणले आहे. पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Updated on 31 October, 2022 9:27 AM IST

महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाने शेतकऱ्यांना (Farmers) अक्षरशः मेटाकुटीला आणले आहे. पावसाने (Rain) खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

रब्बी हंगाम (Rabi Season) सुरु झाला आहे. काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्या आहेत. मात्र नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई (Damages compensation) मिळालेली नाही.

अशा स्थितीत शेतकरी आता रब्बी पेरणीसाठी (Rabi sowing) कर्ज काढण्याच्या मुद्द्यावर आले आहेत. मात्र, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister abdul sattar) यांनी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा करून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.

संकटांची मालिका संपेना! मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; सोयाबीन आणि कापूस पिकाला मोठा फटका

या पिकांचे अधिक नुकसान होते

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 850 मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा 1 हजार 350 ते 1 हजार 400 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जे प्रति वर्ष 400 मिमी पेक्षा जास्त आहे. सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्व काही उद्ध्वस्त केले आहे.

यंदा पावसाने सोयाबीन, उडीद, मूग, कापूस पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनीही शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र दसरा निघून गेला आणि आता दिवाळीही उजाडली, मात्र आजतागायत प्रत्यक्षात काहीच फायदा झाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक विमा मिळालेला नाही. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. रब्बी हंगाम सुरू झाला असून, अशा स्थितीत रब्बीची पेरणी कशी करायची हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

सुवर्णसंधी! एलआयसी देत आहे 20 लाख रुपये; अनेकांनी घेतला फायदा, तुम्हीही करा असा अर्ज

आता रब्बीची पेरणी कशी होणार?

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसानभरपाई मिळाली नाही.दिवाळीच्या दिवशीही मदत मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुसळधार पाऊस आणि माघारीच्या पावसाने पिके वाहून गेली असून, दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

खरीप हंगामात काहीच शिल्लक राहिलेले नाही, तर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून रब्बी हंगामात हरभरा, ज्वारीची पेरणी सुरू केली आहे. दरम्यान, शासनाने लवकरात लवकर पीक विमा व पूर अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मराठवाड्यात एवढ्या हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्टपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात १२ लाख ४९ हजार ७३१ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उरलेल्या पिकांचे नुकसान झाल्याच्या वेदनेतून शेतकरीही बाहेर आला नव्हता. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात 17 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे 28 लाख 76 हजार 816 शेतकरी बाधित झाले आहेत. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना 2479 कोटी रुपयांची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या:
गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! पूल तुटल्याने शेकडो लोक पाण्यात बुडाले; आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू
काळ्या तांदळाची लागवड बदलवणार शेतकऱ्यांचे नशीब! बाजारात मिळतोय 200 ते 300 रुपये किलो भाव

English Summary: Agriculture Minister's promise to go to the farmers, but still no compensation; Farmer Metakutila
Published on: 31 October 2022, 09:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)