News

महाबळेश्वर येथे संशोधनासाठी येणारे शास्त्रज्ञ, परदेशी पाहुणे व शेतकरी याना राहण्यासाठी उपयोगी होईल. माणिकराव कोकाटे यांनी सध्याच्या जुन्या अतिथिगृहाची पाहणी केली. त्यानंतर नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीची जागा व आराखडा पहिला.

Updated on 13 June, 2025 10:39 AM IST

सातारा : महाबळेश्वर येथील विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरु असून आता स्ट्रॉबेरी संदर्भात संशोधनास मान्यता मिळाली आहे. त्याचे देखील काम सुरु आहे. लवकरात लवकर केंद्र अद्ययावत करून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे प्रति कुलपती माणिकराव कोकाटे हे महाबळेश्वर येथील वेण्णालेक नजीक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारत अतिथीगृह भूमिपूजनप्रसंगी बोलत होते.

श्री. कोकाटे म्हणाले, महाबळेश्वर येथे संशोधनासाठी येणारे शास्त्रज्ञ, परदेशी पाहुणे शेतकरी याना राहण्यासाठी उपयोगी होईल. माणिकराव कोकाटे यांनी सध्याच्या जुन्या अतिथिगृहाची पाहणी केली. त्यानंतर नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीची जागा आराखडा पहिला. यातील बारकावे समजून घेत अभियंत्यांना काही बदल कारण्यासह महाबळेश्वर पर्यटन स्थळास शोभेल असे दर्जेदार काम करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष तुषार पवार, विद्यापीठ अभियंता डॉ. मिलिंद ढोके गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम, गहू रोग शास्त्रज्ञ डॉ. मनीष सुशीर, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. विक्रांत साळी, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह गहू गेरवा संशोधन केंद्रातील कर्मचारी,कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील अधिकारी कर्मचाऱ्यासह मान्यवर उपस्थित होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे अतिथीगृह भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधारणा केंद्र (CIMMYT) मेक्सिको येथील गहू तांबेरा शास्त्रज्ञ रोगावर काम करणारे शास्त्रज्ञ शेतकरी यांच्यासाठी उपयोगी येणार असल्याचे गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ दर्शन कदम यांनी सांगितले.

English Summary: Agriculture Minister Manikrao Kokate laid the foundation stone of the guest house of the Wheat Gerwa Research Center in Mahabaleshwar
Published on: 13 June 2025, 10:39 IST