मुंबई
राज्यातील हवमान बदल, शेतीतील नवीन प्रयोग आणि संशोधन याबाबतची माहिती तात्काळ माध्यमांपर्यत पोहचवत जावा, अशा सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विद्यापीठांना दिल्या आहेत. तसंच कृषी विद्यापीठात सुरु असणाऱ्या घडामोडींची माहिती तात्काळ द्यावी, अशा सूचना कृषिमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत.
कृषी विद्यापीठांत सुरु असणाऱ्या घडामोडींची माहिती सामान्य शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन घडामोडींची, हवामान बदलाची, नवीन पीक वाण याबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कृषी विभागाकडून एक पत्रक काढत कृषीबाबतच्या घडामोडी तात्काळ सांगव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञांची कृषिमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली होती. यावेळी खरीप हंगामात फवारणीसाठी विद्यापीठांनी ड्रोनद्वारे फवारणीचे पथदर्शी प्रात्यक्षिके राबवावी, असे आदेश दिले होते.
Published on: 16 August 2023, 03:11 IST