News

सध्या रब्बी हंगामाच्या सगळ्या पेरण्या पूर्ण झाले असून रब्बी हंगामासाठी खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु अशातच रासायनिक खत कंपन्यांनी रासायनिक त्याच्या किमतींमध्ये वाढ करून शेतकऱ्यांना झटका दिला आहे.

Updated on 17 January, 2022 10:20 AM IST

सध्या रब्बी हंगामाच्या सगळ्या पेरण्या पूर्ण झाले असून रब्बी हंगामासाठी खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु अशातच रासायनिक खत कंपन्यांनी रासायनिक त्याच्या किमतींमध्ये वाढ करून शेतकऱ्यांना झटका दिला आहे.

रासायनिक खतांच्या एका बॅग मागे 50 ते 195 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. यांच्या किमती मध्ये झालेल्या या वाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केंद्राकडे पत्राद्वारे केली आहे.

 कृषी मंत्री दादा भुसे यांनी आधी च्या किमती व आता वाढलेले खतांचे किमतींची आकडेवारी मांडत केंद्रे खते व रसायन मंत्री मंनसुख मंडाविया यांना पत्र लिहिले आहे.

रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवड योग्य क्षेत्र वाढलेले आहे.त्यामुळे आता ची मागणी वाढली आहे परंतु अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणेशेतकऱ्यांना परवडणारे नाही.त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अत्यल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी असून खतांच्या वाढत्या किमती मुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

त्यामुळे रासायनिक खतांच्या किमती खत उत्पादकांनी पूर्ववत कराव्यात. तसेच खत उत्पादकांनी राज्यात सहा डिसेंबर 2021 रोजी घोषित केलेल्या दरानुसार खतांची विक्री करावी. त्यासाठी आवश्यक पावले केंद्र सरकारने उचलावीत  आणि रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे दादा भुसे यांनी पत्रात म्हटले आहे.

English Summary: agriculture minister dada bhuse get dimand to decrease fertilizer price to mansukh mandaviya
Published on: 17 January 2022, 10:20 IST