News

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात जिवनाश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान कृषी बाजार समित्या चालू राहतील का नाही याविषयीची शंका उपस्थित होत होती. परंतु शेतीविय़षक व्यापर चालू राहणार आहे.

Updated on 27 March, 2020 12:25 PM IST


कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात जिवनाश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान कृषी बाजार समित्या चालू राहतील का नाही याविषयीची शंका उपस्थित होत होती. परंतु शेतीविय़षक व्यापर चालू राहणार आहे. शहरांमधील भाजीपाला पुरवठा खंडित होऊ नये यासाठी बाजार समित्या सुरू राहणार आहेत. यासह कृषी संबंधित बियाणे, खते पीक कापणी आदी कारणास्तव असलेली वाहतूक लॉकडाऊनमध्ये सुरळीतपणे सुरू राहतील, असे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले होते.

आज नाशिकसह पुणे, मुंबई येथील समित्या सुरू झाल्या आहेत. शेतमालाचा पुरवठा सुरळीत होण्याकरीता प्रशासनाने समित्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक बाजार समितीचे कामकाज पेठरोड येथील बाजार आवारातून होणार आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी शेतमाल विक्री नियमित पंचवटी मुख्य बाजार आवारात होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून येथील होणारा बाजार पेठरोड येथील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विक्री होणार असल्याची माहिती सचिव अरुण काळे यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासकीय सूचनांचे पालन करण्यात येत असून प्रत्येक घटकांना मास्क किंवा रुमाल बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे.

English Summary: agriculture market committee open in nashik
Published on: 27 March 2020, 12:24 IST