News

शेती करणे म्हणजेच मरणाला मुठीत ठेवणे. शेतकरी राजा जगाचा पालन पोषण करण्यासाठी तारेवरची कसरत करतो. उन्हातान्हात घाम गाळतो तेव्हा कुठे आपण सकाळ-संध्याकाळ मोठ्या चवीने जेवणावर ताव हाणतो. शेती हा बारामाही धंदा लोकांचे पोट भरण्यासाठी बळीराजा जीवाची पर्वा न करता शेतात राबतो, मात्र, लोकांचे पोट भरता-भरता एका शेतकरी राजाला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. कळंब तालुक्यात शेतात काम करताना उष्माघाताने एका शेतकरी राजाचे आकस्मिक निधन झाले.

Updated on 01 April, 2022 10:04 PM IST

शेती करणे म्हणजेच मरणाला मुठीत ठेवणे. शेतकरी राजा जगाचा पालन पोषण करण्यासाठी तारेवरची कसरत करतो. उन्हातान्हात घाम गाळतो तेव्हा कुठे आपण सकाळ-संध्याकाळ मोठ्या चवीने जेवणावर ताव हाणतो. शेती हा बारामाही धंदा लोकांचे पोट भरण्यासाठी बळीराजा जीवाची पर्वा न करता शेतात राबतो, मात्र, लोकांचे पोट भरता-भरता एका शेतकरी राजाला आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. कळंब तालुक्यात शेतात काम करताना उष्माघाताने एका शेतकरी राजाचे आकस्मिक निधन झाले.

सध्या कळंब तालुक्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस उंच झेप घेत आहे. हवामान खात्याने कळंब तालुक्यात उष्णतेच्या लाटेचा सतर्क इशारा दिला आहे. असे असले तरी, शेतात राबराब राबणारा बळीराजा हवामान खात्याच्या सतर्कतेचा इशारा बाजूला सारत 41 डिग्री सेल्सिअस तापमानात लोकांचे पोट भरण्यासाठी भर उन्हात शेतात काम करतोय. तालुक्यातील हासेगाव येथील असाच एक शेतकरी राजा ज्वारीच्या कडब्याची बांधणी करताना उष्माघातामुळे मरण पावला. गुरुवारी ही दुर्दैवी घटना मौजे हासेगाव येथे घडली.

हासेगाव येथील लिंबराज तुकाराम सुकाळे शेतात काम करताना उष्माघाताने मृत्यू पावले. मराठवाड्यात उष्माघाताने हा पहिलाच मृत्यू असल्याची माहिती समोर येत आहे. कळंब तालुक्यात तापमानाने सर्व रेकॉर्ड ध्वस्त केले आहेत दुपारी बारा वाजता कळंब तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा 40 डिग्री सेल्सिअस पार करत आहे. दुपारी घराबाहेर पडणे देखील कठीण होऊन बसले आहे.

मात्र ते फक्त एसी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना शेतकरी राजाला भर उन्हातही काम करावे लागते त्याच्या पाचवीला जणू काही कामच पुजलेले होते. मौजे हासेगाव येथील शेतकरी लिंबराज ज्वारीचा कडबा बांधत होते, तापमान अधिक असल्याने लिंबराज यांना पाण्याची तहान लागली. उन्हामुळे जीवाची लाही-लाही होत असल्याने या शेतकरी राजाने खूपच अधिक पाणी पिले. यामुळे लिंबराज यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा सतर्क इशारा दिला आहे, असे असले तरी शेतकरी राजाला काम करण्याशिवाय काही गत्यंतर नाही.

लिंबराज देखील शेतीमध्ये कडबा बांधण्यासाठी गेले. दुपारपर्यंत त्यांनी काम देखील केले मात्र उन्हामुळे त्यांना प्रचंड तहान लागली आणि त्यांनी ढसाढसा पाणी पिले यामुळे उष्माघाताचा झटका बसला, म्हणून त्यांना कळंब तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी उष्माघाताने दगावल्याचे स्पष्ट केले. लिंबराज यांच्या जाण्याने शेती करणे म्हणजे तारेवरची कसरत असून जीवन-मरणाचा खेळच आहे हे स्पष्ट झाले.

संबंधित बातम्या:-

कापसाच्या झळाळीनंतर आता सोयाबीनच्या दरात वाढ; हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?

आंनदाची बातमी! गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर 'या' बाजार समितीचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; निर्णय छोटा पण लाख मोलाचा

English Summary: Agriculture is a game of life and death! Farmer dies of heatstroke in Kalamb
Published on: 01 April 2022, 10:04 IST