आपल्याला माहिती आहेस की शेतमाल काढण्याचे दिवस सुरू झाले की, शेतमाल बाजारात यायला लागतो. जवाब मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक वाढते नेमकी त्यावेळेस शेतमालाचे दर घसरतात. आणि शेतमालाची आवक कमी झाली तर दर वाढतात.
हेनित्याचे झाले आहे. या अरिष्टातुन शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी वखार महामंडळाने वखार आपल्या दारी, मंडळाचे वचन शेतकऱ्यांचे संरक्षण अभियान हाती घेतले आहे.
या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात असलेल्या 204 वखार केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल ठेवता येणार आहे व त्या मालावर 70 टक्क्यांपर्यंत तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा फायदा असा होईल की, शेतकऱ्यांना आर्थिक अडचण आल्यानंतर त्यांना कमी भावात आपला शेतमाल विकायची गरज न पडता शेतमाल तारण ठेवून आपली आर्थिक निकड भागवता येणार आहे.
परिणामी बाजारात शेतमालाचे दर वाढल्यानंतर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवता येईल.म्हणजेच वखार महामंडळाच्या तारण कर्जामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गरजही भागेल आणि बाजार भाव वाढल्यानंतर शेतमाल विकल्याने चांगला नफाही मिळेल.
वखार महामंडळाच्या अभियानामुळे शेतकर्यांचा शेतमाल प्राधान्याने गोदामात ठेवण्याच्या सूचना आहेत. शेतकऱ्यांना या अभियानाची माहिती मिळावी व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी हे अभियान गावपातळीवर राबवले जात आहे. या अभियानांतर्गत कडधान्य स्वरूपातील धान्य वखार महामंडळ शेतकऱ्यांकडून स्वीकारणार आहे.
यामध्ये सोयाबीन,तुर, मुग, उडीद आणि हरभरा या पिकांचा समावेश आहे. याच्या अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वखार महामंडळाच्या गोदामात शेतकऱ्यांनी शेतमाल ठेवल्यावर त्याचे निम्मे भाडे वखार महामंडळभरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाड्याचा खर्चही वाचणार आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांसोबत शेतकरी उत्पादक कंपन्या देखील घेऊ शकणार आहेत.
Published on: 22 November 2021, 11:36 IST