News

आपण पाहत आहोत की मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या वायदे बंदी या निर्णयानंतर सोयाबीनच्या भावामध्ये काय स्थित्यंतर होईल हा मोठा प्रश्न आहे.

Updated on 26 December, 2021 10:12 AM IST

 आपण पाहत आहोत की मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या वायदे बंदी या निर्णयानंतर सोयाबीनच्या भावामध्ये काय स्थित्यंतर होईल हा मोठा प्रश्न आहे.

यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या भावात घसरण सुरू झाल्यानंतर सोयाबीन बाजारपेठेत न आणता त्याची साठवणूक करण्यावर भर दिला होता. त्यामुळे असे वाटत होतं की, सरकारचा निर्णय आणि शेतकऱ्यांनी केलेली साठेबाजी यामुळे भावात मोठी घसरण होईल. मात्र तसे न करता शुक्रवारी सोयाबीनच्या भावात आणखी दोनशे रुपयांची वाढ झाली.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बदलत्या बाजारपेठ व्यवस्थे सोबत शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाव वाढतील असे सध्यातरी चित्र बाजारात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करावी हाच एकमेव पर्याय आहे.

 केंद्र सरकारने सोयाबीन समवेत इतर आठ कृषी मालावर  वायदे बंदी केली आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना भावाचा अंदाज बांधता येणे कठीण आहे. शिवाय शेतकऱ्यांना दिला जाणारा वायद्याचाफायदा व्यापारी आणि अडते यांनाच मोठ्या प्रमाणात होतो. परंतु आता कृषी बाजारातील व्यवस्थेमध्ये बदल होताना दिसत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील खरेदी विक्री बाबत व्यवस्थित अभ्यास करून निर्णय घेणे आता आवश्यक आहे. आता वायदे बंद असले तरी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आवक न करता टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करणे आवश्यक आहे.

अन्यथा भावात वाढ झाली म्हणून आवक जर वाढली तर दरात झपाट्याने घसरण होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

 बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक भाव वाढण्याच्या अपेक्षेने  केलेली आहे. त्यातील साठवणूक केलेल्या सोयाबीन मधील आद्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे चांगल्या दर्जाचा सोयाबीन असतानाही त्याला चांगला भाव मिळत नाही. मध्यंतरी सहा हजार सातशे रुपये पर्यंत गेलेले सोयाबीनचे भाव आता 6300 तीनशे रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ( संदर्भ- मराठी पेपर)

English Summary: agriculture expert give some important advice about soyabioen rate
Published on: 26 December 2021, 10:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)