खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता खरिपाची तयारी करण्यासाठी शेतकरीराजा सज्ज झाला आहेच परंतु राज्याचा कृषी विभाग देखील ऍक्शन मोडवर असून जिल्हानिहाय खरीप हंगामाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते आणि बियाणे च्या बाबतीत कुठल्याही प्रकारची टंचाई किंवा समस्या जाणवू नये यासाठी खते आणि बियाणे यांची पुरेपूर उपलब्धता व्हावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि प्रमाणात बियाण्यांचा सुरळीत पुरवठा करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. खरीप हंगाम 2022 बियाणे पुरवठा आणि उपलब्धतेबाबत बैठक आयोजित करण्यात आल्याप्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा, या वर्षी सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज धरून सोयाबीनचे बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे. एवढेच नाही तर तेलबियांच्या बियाण्याच्या बाबतीत देखील नियोजन करून त्याची उपलब्धता वाढवावी, त्यासोबतच विविध योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी. या संबंधित कुठल्याही शेतकऱ्यांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे असे स्पष्ट निर्देश दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.
तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी व संबंधित पिकांची मूल्य साखळी विकसित व्हावी यासाठी विशेष कृती योजना राबवली जाणार असल्याची माहिती देखील ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
बियाणे पुरवठा बाबत कृषी विभागाचा प्लान
राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांना दर्जेदार तसेच प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा व्हावा, बियाण्याच्या बाबतीत कुठल्याही शेतकरी बांधवाची तक्रार येऊ नये याची काळजी घ्यावी. या वर्षी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने बियाण्यांची उपलब्धता वाढवण्यात यावी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या खरीप हंगामात खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहीत धरून खोड माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शक्य त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.
त्यासोबतच कृषी विभाग, कृषी विद्यापीठे तसेच महाबीज या सगळ्या संस्थांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:मानला लेका; शेतकऱ्यांच्या मुलांचे नेत्यांचे मुखवटे घालून अनोखे आंदोलन
नक्की वाचा:खरिप हंगामात करा या औषधी वनस्पतीची लागवड आणि मिळवा 7 पटीने फायदा
नक्की वाचा:मोफत रेशनबाबत सरकारची मोठी घोषणा, आता 'या' लोकांना मोफत मिळणार नाही रेशन
Published on: 12 May 2022, 10:34 IST