News

खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे व कृषी निविष्ठांची गरज भासत असते. अशावेळी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागामार्फत खरीप हंगामात होणाऱ्या पीक पेरणीचे नियोजन, बियाण्यांबाबत होणारी फसवणूक टाळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती, संचालक श्री.पाटील यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

Updated on 02 July, 2024 10:23 PM IST

मुंबई : राज्यात खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा माफक दरात उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे कृषी आयुक्तालय, पुणे येथील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सांगितले.

खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे व कृषी निविष्ठांची गरज भासत असते. अशावेळी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागामार्फत खरीप हंगामात होणाऱ्या पीक पेरणीचे नियोजन, बियाण्यांबाबत होणारी फसवणूक टाळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती, संचालक श्री.पाटील यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार, दि.3, गुरुवार दि. 4, शुक्रवार दि. 5 आणि शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदिका श्रीयोगी मांगले यांनी ही मुलाखत घेतली आहे.

English Summary: Agriculture Department is striving to provide quality inputs to farmers
Published on: 02 July 2024, 10:23 IST