News

राज्यात सर्वत्र रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे, आणि नेमक्या ऐन हंगामात अनेक जिल्ह्यात खत टंचाई निर्माण झाल्याचे प्रसार माध्यमांमधून समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यात देखील रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड केली गेली आहे. उन्हाळी कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादन वाढीच्या अनुषंगाने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांची मागणी करताना दिसत आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यात संयुक्त खतांचा मोठा तुटवडा होत असल्याचे समोर येत आहे.

Updated on 18 January, 2022 9:28 PM IST

राज्यात सर्वत्र रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे, आणि नेमक्या ऐन हंगामात अनेक जिल्ह्यात खत टंचाई निर्माण झाल्याचे प्रसार माध्यमांमधून समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यात देखील रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड केली गेली आहे. उन्हाळी कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादन वाढीच्या अनुषंगाने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांची मागणी करताना दिसत आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यात संयुक्त खतांचा मोठा तुटवडा होत असल्याचे समोर येत आहे.

कांदा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कांदा उत्पादक शेतकरी 10:26:26, डीएपी सारख्या कंपाउंड म्हणजे संयुक्त खतांसाठी सैरावैरा वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रात धाव घेताना दिसत आहेत. त्यामुळे संयुक्त खतांचा मागणी आणि पुरवठा यामध्ये ताळमेळ बसत नाहीय परिणामी जिल्ह्यात सर्वत्र खर्च टंचाई निर्माण झाल्याचे समोर येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा नाशिक जिल्ह्यात टंचाईची समस्या अधिक प्रकर्षाने जाणवून येत आहे. या गोष्टीची दखल घेत जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आल्याचे समोर येत आहे, खतटंचाईवर मात देण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक नामी कल्पना सुचवली आहे. आणि त्यासंदर्भात जिल्ह्यातील कृषी विभागाने चक्क एक प्रसिद्धी पत्रक देखील शेतकऱ्यांच्या नावे जारी केले आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, शेतकरी राजांनी संयुक्त खत वापरण्याऐवजी बाजारात उपलब्ध असलेल्या सरळ खतांचा वापर करावा. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक मुलतत्वे नत्र स्फुरद आणि पालाश हे केवळ संयुक्त खतांद्वारे देता येतात असे नाही तर वेगवेगळ्या सरळ खतांच्या योग्य मात्रा घेऊन तेथील यामुळे मूलतत्त्वांची अर्थात अन्नद्रव्यांची पूर्तता करता येते. जर शेतकऱ्यांनी या सरळ खतांचा वापर वाढवला तर जिल्ह्यात उत्पन्न झालेली खत टंचाई कायमची दूर करता येऊ शकते. संयुक्त खतांऐवजी सरळ खते जसे की युरिया, एमओपी, सिंगल सुपर फास्फेट या खतांच्या मिश्रणाचा वापर करावा. 

संयुक्त खतांसाठी जेवढा खर्च होतो तेवढाच खर्च सरळ खतांचे मिश्रण तयार करण्यासाठी येतो असे देखील सांगितले जात आहे. अलीकडे अनेक कंपन्यांनी सिंगल सुपर फास्फेट मध्ये झिंक आणि बोरॉन मिक्स करून देखील विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यातून पिकास सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवले जाऊ शकतात असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांना आहे. तसेच कृषी विभागाने यावेळी नमूद केले की, शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून खते खरेदी करताना ही पोस्ट द्वारे आधार कार्ड जमा करून ओरिजनल बिल पावती घेऊनच खते खरेदी करावीत. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की,10:26:26 यामध्ये एका किलोला नत्र 5, स्फूरद आणि पालाश प्रत्येकी 13 टक्के या प्रमाणात उपलब्ध असते. आपण या संयुक्त खतांऐवजी युरिया अर्धी गोणी, सिंगल सुपर फॉस्फेट तीन गोणी, एमओपी अर्धी गोण यांचा संयुक्त मिश्रणाचा वापर करू शकता. 

यातून आपणास 10.35 टक्के नत्र, 24 टक्के स्फुरद आणि 15 टक्के पालाश मिळून जातो तसेच सल्फर 16.5 मिळून जाते. आपण या पद्धतीने कृषी वैज्ञानिकांचा अथवा अनुभवी शेतकऱ्यांचा अथवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला घेऊन इतर संयुक्त खतांसाठी पर्यायी सरळ खतांच्या मिश्रणाचा वापर करून ही निर्माण झालेली खत टंचाई कमी करू शकता.

English Summary: agriculturasl department give advice to farmers regarding fertilizer uses
Published on: 18 January 2022, 09:28 IST